Home /News /lifestyle /

18+ Corona vaccination : खासगी रुग्णालयात तुमच्यासाठी कोरोना लशीची किंमत किती?

18+ Corona vaccination : खासगी रुग्णालयात तुमच्यासाठी कोरोना लशीची किंमत किती?

देशातील तीन मोठ्या खासगी रुग्णालय समूहांनी कोरोना लशीची (Corona vaccine price) किंमत ठरवली आहे.

    मुंबई, 01  मे : आज काही राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला (Third Phase of Vaccination) सुरुवात होत आहे. तर, काही राज्यांनी लशींच्या तुटवड्याचं कारण देत आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. महाराष्ट्रानेही तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात करणं शक्य नसल्याचं सांगितलं होतं पण काही ठिकाणी 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस दिली जाते आहे. मुंबईत नायर हॉस्पिटल, बीकेसी जम्बो फॅसिलिटी, कूपर हॉस्पिटल, सेवन हिल्स हॉस्पिटल आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये अठरा वर्षांवरील व्यक्तींना लस मिळेल, असं बीएमसीने सांगितलं. दरम्यान काही खासगी रुग्णालयांनीसुद्धा लसीकरण सुरू केलं आहे. त्यांनी आपल्या लशीची किंमत जारी (Corona vaccine price) केली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस प्रति डोस खासगी हॉस्पिटलसाठी 1200 रुपये आहे, तर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस 600 रुपये आहे. आता खासगी रुग्णालयांमार्फत सर्वसामान्यांसाठी या लशीची किंमत किती असेल हे रुग्णालयांनी को-विन पोर्टलवर जाहीर करावं, असं केंद्राने सांगितलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार देशातील तीन मोठ्या रुग्णालयांनी तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू केलं आहे. यामध्ये अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospitals), मॅक्स हेल्थकेयर (Max Healthcare) आणि फोर्टिस हेल्थकेयर (Fortis Healthcare) या हॉस्पिटल्सचा समावेश आहे. हे वाचा - होम आयसोलेशननंतर कोरोना टेस्ट करण्याची गरज नसते? AIIMS चे प्रमुख म्हणाले... लस उत्पादक कंपन्यांकडून आपल्याला लशीचा पुरवठा झाल्याची माहिती या रुग्णालयांनी दिली आहे. त्यांनी कोरोना लशीच्या किमतीही जाहीर केल्या आहेत. मॅक्स हेल्थकेयर ग्रुप ईडी नाऊच्या वृत्तानुसार मॅक्स हेल्थकेअरने 1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरण सुरू केलं आहे. समूहाचे सीएमडी अभय सोई यांनी सांगितलं, की या लशीची किंमत प्रति डोस 800 ते 900 रुपये असेल. पंचशील पार्क. पटपडगंज, शालिमार बाग आणि राजिंद्र प्लेस या ठिकाणी हे लसीकरण केलं जातं आहे. अपोलो हॉस्पिटल अपोलो रुग्णालय समूहाने शनिवारपासून लसीकरणाची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  हैदराबाद, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता  या ठिकाणी अपोलो रुग्णालयात  18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. 3 किंवा 4 मेपासून हे लसीकरण सुरू होईल. मीडिया रिपोर्टनुसार लशीचा पुरवठा न झाल्याने अपोलो केंद्रावर एक मेपासून लसीकरण सुरू झालं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे वाचा - Relianceचा Oxygen पुरवठ्याचा भीम पराक्रम,10 पैकी एका रुग्णाला प्राणवायुचा पुरवठा अपोलो केंद्रावर भारत बायोटेकची कोवॅक्सिन प्रति डोस 1200 रुपये असेल. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड 800 रुपये असेल. कोविशिल्डची किंमत तशी 600 रुपये आहे पण लस देण्याचे 200 रुपये घेतले जातील. फोर्टिस हेल्थकेयर मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोर्टिस केंद्रांवर कोवॅक्सीन लशीची किंमत 1250 रुपये प्रति डोस असेल. यामध्ये लशीची किंमत आणि लस देण्याची फीसुद्धा आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Corona vaccine cost, Coronavirus

    पुढील बातम्या