Home /News /lifestyle /

चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं एखाद्याचं व्यक्तिमत्व

चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं एखाद्याचं व्यक्तिमत्व

तीळ आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक संकेत देतात, ज्यामध्ये काही शुभ मानले जातात तर काही तीळ अशुभ मानले जातात. याशिवाय ज्योतिषशास्त्रात तिळावरूनही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जाणून घेता येते.

    मुंबई, 13 मे : मानवी शरीराच्या काही भागांवर अनेक लहान काळे-लाल ठिपके दिसतात, ज्यांना आपण तीळ म्हणतो. जर हे तीळ चेहऱ्यावर असतील तर ते चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. तसे, हे तीळ माणसाचे सौंदर्य तर वाढवतातच पण ज्योतिष शास्त्रात (Astrology) त्यांना खूप महत्त्वाचे मानले जाते. हे तीळ आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक संकेत देतात, ज्यामध्ये काही शुभ मानले जातात तर काही तीळ अशुभ मानले जातात. याशिवाय ज्योतिषशास्त्रात तिळावरूनही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जाणून घेता येते. भोपाळचे ज्योतिषी विनोद सोनी (पोद्दार) यांनी चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तिळांबद्दल खास (Mole On Face) माहिती सांगितली आहे, जाणून घेऊया. ओठावर तीळ असणं - जर वरच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर तुम्हाला जीवनसाथीची पूर्ण साथ मिळते. वरच्या ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असणे हे जोडीदारासोबत सतत वादाचे सूचक मानले जाते. खालच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर त्या व्यक्तीला आपल्या क्षेत्रात खूप प्रसिद्धी मिळते. त्यांना खाद्यपदार्थांबद्दल विशेष आसक्ती नसते, विरुद्ध लिंग त्यांना अधिक आकर्षित करतात. खालच्या ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असणे हे एखाद्या विशिष्ट आजाराचे सूचक असते आणि अशा व्यक्तीला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात आणि नवीन कपडे घालायला आवडतात. भुवयांवर तीळ असणं - दोन्ही भुवयांवर तीळ असेल तर या व्यक्तींना नेहमी प्रवासाचे योग असतात. उजव्या भुवयावरील तीळ हे सुखी वैवाहिक जीवनाचे लक्षण आहे आणि डाव्या भुवयावरील तीळ दुःखी वैवाहिक जीवन दर्शवते. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी तीळ असल्यास ती व्यक्ती खूप बुद्धिमान असते. या लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांच्या कामात यश आणि पैसा मिळतो. नाकावर तीळ असणे - नाकाच्या पुढील भागावर (नाकाच्या शेंड्यावर) तीळ असेल तर अशी व्यक्ती लक्ष्य निर्धारित करून काम करणारी असते. ज्या ठिकाणी नाकाच्या तळाशी तीळ (मिशीच्या भागात) असतो, ते लोक अधिक विलासी असतात आणि त्यांना झोपायला खूप आवडते. नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर त्या व्यक्तीला जीवनात सुख, संपत्ती आणि संपत्तीची कमतरता भासणार नाही. नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर जीवनात संघर्ष, यशातील अडथळे दर्शवते. कपाळावर तीळ - कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असणे हे सूचित करते की तुमची संपत्ती नेहमीच वाढत राहील. कपाळाच्या मध्यभागी तीळ असणे हे भाग्यवान आणि शुद्ध प्रेमाचे लक्षण मानले जाते. कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ असणे हे व्यर्थपणाचे लक्षण आहे. हे वाचा - या राशींवर शनीची साडेसाती झालेली आहे सुरू; त्रास होतील, जपून करा व्यवहार गालावर तीळ - उजव्या गालावर तीळ असेल तर अशी व्यक्ती धनवान असते. डाव्या गालावर तीळ असेल तर अशी व्यक्ती उधळपट्टी करणारी असते. हनुवटीवर तीळ असणे - हनुवटीवर तीळ असेल तर ती व्यक्ती यशस्वी आणि समाधानी असते. हनुवटीवर तीळ असणे शुभ मानले जाते. त्या माणसाकडे पैसे मिळवण्याचे साधन नेहमीच असते. ज्या स्त्रीच्या हनुवटीवर तीळ असतो तिच्यात सामाजिकतेचा अभाव असतो. ज्या पुरुषाच्या हनुवटीवर तीळ असतो, त्याचे स्त्रीवर प्रेम नसते, त्याचे स्त्रीशी सारखे वैर असते. हे वाचा - जांभूळ खाऊन बिया फेकू नका; रक्तातील साखर नियंत्रणावर असा होतो उपयोग डोळ्यावर तीळ असणे - उजव्या डोळ्यावर तीळ असणाऱ्यांची सारखी स्त्रीवर नजर असते. डाव्या डोळ्यावर तीळ असेल तर व्यक्तीचे विचार उच्च असतात. डोळ्यांवर तीळ असलेले लोक सहसा भावनिक असतात. उजव्या डोळ्यावर तीळ स्त्रीशी एकता दर्शवते आणि डाव्या डोळ्यावर तीळ स्त्रीशी मतभेद दर्शवते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Personal life

    पुढील बातम्या