Home /News /lifestyle /

Shani Sade Sati: या राशींवर शनीची साडेसाती झालेली आहे सुरू; त्रास होतील, जपून करा व्यवहार

Shani Sade Sati: या राशींवर शनीची साडेसाती झालेली आहे सुरू; त्रास होतील, जपून करा व्यवहार

12 जुलैपर्यंत शनी कुंभ राशीत राहील आणि जुलैमध्ये त्यांची वक्री चाल सुरू होईल. शनी या राशीच्या बदलामुळे काही लोकांची चालू असलेली साडेसाती संपेल, तर काही लोकांना साडेसाती सुरू होऊन त्रासदायक ठरेल.

    नवी दिल्ली, 12 मे : शनि ग्रहाने 29 एप्रिल 2022 रोजी मकर राशी सोडून आणि कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शनीचा राशी बदल सुमारे अडीच वर्षांनी झाला असून शनीने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. 12 जुलैपर्यंत शनी कुंभ राशीत राहील आणि जुलैमध्ये त्यांची वक्री चाल सुरू होईल. शनी या राशीच्या बदलामुळे काही लोकांची चालू असलेली साडेसाती संपेल, तर काही लोकांना साडेसाती सुरू होऊन त्रासदायक ठरेल. मीन राशीला आता साडेसाती- हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, शनीच्या संक्रमणाने मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू झाली आहे. शनिच्या साडेसातीचे तीन चरण आहेत. शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच कर्क आणि वृश्चिक राशींवर शनी साडेसाती सुरू होईल. या काळात या राशीच्या लोकांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात शनिमुळे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते. या राशींची साडेसातीतून सुटका- अलिकडेपर्यंत शनी मकर राशीत फिरत होता, त्यामुळे धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव होता. मात्र 29 एप्रिल रोजी शनीच्या राशी बदलामुळे धनु राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळाली आहे. मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी दुसरा टप्पा 29 एप्रिलपासून सुरू झाला आहे. याशिवाय मिथुन आणि तूळ राशीवरील शनिची साढेसाती समाप्त झाली आहे. हे वाचा - आर्थिक चणचण, अनंत अडचणी दूर करण्यासाठी तुळशीचा असा करतात उपयोग शनि कर्मानुसार फळ देतो- शनीला न्यायाची देवता म्हणतात. असे म्हटले जाते की शनिदेव आपल्या कर्मानुसार लोकांना फळ देतात. जर व्यक्तीची कर्मे चांगली असतील आणि कुंडलीत शनी कुंभ स्थानात असेल तर साढेसातीच्या काळातही त्या व्यक्तीला खूप मान-सन्मान मिळतो. याशिवाय, तूळ, मकर, कुंभ आणि धनु राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती बाकीच्या राशींपेक्षा जास्त त्रासदायक नाही. तूळ राशीमध्ये शनि श्रेष्ठ मानला जातो आणि तो मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. धनु आणि मीन राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती आहे. गुरू आणि शनि यांच्यात मैत्रीची भावना आहे. हे वाचा - Hair Care Tips: एका आठवड्यात केस कितीवेळा धुवावेत? अनेकजण इथंच चूक करतात (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या