जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Fitness Tips : जिम की मोकळ्या हवेत; कोणत्या ठिकाणी Excercise करण्याचा अधिक फायदा?

Fitness Tips : जिम की मोकळ्या हवेत; कोणत्या ठिकाणी Excercise करण्याचा अधिक फायदा?

Fitness Tips : जिम की मोकळ्या हवेत; कोणत्या ठिकाणी Excercise करण्याचा अधिक फायदा?

आज फिटनेसविषयी जागरूक असलेल्या लोकांच्या जीवनशैलीत व्यायामाला महत्त्वाचे स्थान आहे. काही लोक पार्कमध्ये व्यायाम करतात, तर काही बाहेर जिममध्ये जातात. पण कुठे व्यायाम करणे जास्त फायदेशीर आहे हे त्यांना माहीत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 सप्टेंबर : आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. पूर्वी लोक केवळ पार्कमध्ये किंवा गार्डनमध्ये फिरायला जायचे. आता ते तिथे व्यायामदेखील करतात. तर हल्ली व्यायामासाठी जिमला जाण्याचं वेडही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण मग प्रश्न हा पडतो की, उत्तम आरोग्यासाठी नेमका कुठे व्यायाम करणं योग्य, जिममध्ये की पार्कमध्ये? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं सविस्तर उत्त देणार आहोत. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामाचा फक्त शरीरालाच नाही तर मनालाही फायदा होतो. पार्कमध्ये व्यायाम करायचा की बाहेर जिममध्ये, ते तुमच्यावर अवलंबून आहे. उत्तम आरोग्य, मजबूत शरीर, लवचिकता अशा अनेक गोष्टींवर व्यायामाचा चांगला परिणाम होतो. व्यायामासाठी योग्य ठिकाणाची योग्य निवड केली तर त्याचे आरोग्यावर होणारे फायदे दुप्पट होतात.

पांढरा की लाल; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल

जिममधील व्यायाम किती फायदेशीर? जिममध्ये जाऊन व्यायाम करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण तिथे तुम्हाला ट्रेनरची मदत मिळते. जेणेकरून तुम्हाला योग्य व्यायाम करता येईल. कार्डिओ, वेट ट्रेनिंग यांसारख्या सर्व व्यायामांची माहिती तुम्हाला मिळते. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही व्यायाम मनोरंजक बनवण्यासाठी झुंबा किंवा नृत्य वर्गात सामील होऊ शकता. जर तुम्ही अनुभवी व्यक्तीची मदत घेतली तर नक्कीच तुम्ही तुमचे ध्येय लवकर साध्य कराल.

News18लोकमत
News18लोकमत

पार्कमध्ये व्यायाम करणे किती चांगले? पार्कमध्ये व्यायाम करणे किंवा एखादा खेळ खेळणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्हाला निसर्ग तुमच्या जवळचा वाटतो. ताजी हवादेखील मूड फ्रेश करते आणि शरीराला भरपूर ऑक्सिजन देखील मिळतो. पार्कमध्ये व्यायाम केल्यानंतर तुम्हाला आणखी ताजेतवाने अनुभवू शकता. त्याच वेळी सकाळचे पहिले सूर्यकिरण शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ देत नाही. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. आजकाल उद्यानात ओपन जिमचीही सोय आहे. जे तुम्ही मोफत वापरू शकता. जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम खुल्या हवेत चालणे फायदेशीर टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार तज्ज्ञांच्या मते, ट्रेडमिलपेक्षा मोकळ्या हवेत चालणे शरीरासाठी जास्त फायद्याचे ठरते. पण जर तुम्ही व्यायामशाळेत व्यायाम केलात तर तुम्हाला लोक भेटतात आणि बरे वाटते. पार्कमध्ये व्यायाम करा किंवा जिममध्ये, दोन्ही प्रकारे व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. व्यायामासाठी व्यस्त दिवसातून काढा थोडा वेळ  रोजच्या व्यस्त जीवनातून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. तुम्ही घरच्या कामात व्यस्त असाल किंवा ऑफिसच्या कामात, काही फरक पडत नाही. दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी आरोग्याबाबत जागरूक असणे महत्त्वाचे आहे. व्यायामाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. व्यायाम नीट केला तर सर्वात मोठ्या शारीरिक समस्या आणि रोगावर विजय मिळवता येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात