जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोळी अंगावर चढलेला दिसणं शुभ मानलं जातं की अशुभ? जाणून घ्या त्याविषयी रंजक गोष्टी

कोळी अंगावर चढलेला दिसणं शुभ मानलं जातं की अशुभ? जाणून घ्या त्याविषयी रंजक गोष्टी

कोळी अंगावर चढलेला दिसणं शुभ मानलं जातं की अशुभ? जाणून घ्या त्याविषयी रंजक गोष्टी

Spider Climbing On Body: घरामध्ये कोळी असणे किंवा घरामध्ये कोळ्याचे जाळे असणे अशुभ मानले जात असले तरी, कोळी दिसणे किंवा अंगावर चढणे हा एखादा शुभ संकेत असू शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 मे : निसर्गात (Nature) असे अनेक जीव आहेत, जे आपल्याला आपल्याला रोजच्या रोज पाहायला मिळतात. यातील काही जीव-प्राण्यांना आपण आपल्याजवळ ठेवतो आणि तर काही प्राण्यांना पाहून आपण त्यांना घराबाहेर (Out of Home) हाकलतो. याविषयी अनेक समजुती आहेत ज्या आपण आपल्या वडिलधाऱ्या लोकांकडून खूप दिवसांपासून ऐकत आलो आहोत. काही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात तर काहीजण ठेवत नाहीत. यापैकी एक म्हणजे आपल्या घरांमध्ये दिसणारा कोळी, भारतातील जवळपास प्रत्येक घरात कोळी (Spider) आढळतो. कोळ्याच्या संदर्भात अनेक शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली जातात. आज आपण कोळीशी संबंधित काही शुभ आणि अशुभ गोष्टींबद्दल (Spider Climbing On Body) जाणून घेऊया. घरामध्ये कोळी असणे किंवा घरामध्ये कोळ्याचे जाळे असणे अशुभ मानले जात असले तरी, कोळी दिसणे किंवा अंगावर चढणे हा एखादा शुभ संकेत असू शकतो. असे मानले जाते की, जेव्हा कोळी आपल्या अंगावर चढलेला दिसतो, तेव्हा आपल्याला नवीन कपडे मिळण्याची शक्यता असते. याशिवाय जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये भिंतीवर तळापासून वरपर्यंत कोळी चढताना दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण असू शकते. असे मानले जाते की जर तुम्हाला कोळी भिंतीवर तळापासून वर चढताना दिसला तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच चांगली नोकरी मिळेल किंवा व्यवसायात प्रगती होईल. हे वाचा -  Weekly Horoscope : हा आठवडा पावणार, गृह आणि वाहन सौख्य मिळण्याचे लाभ! तसेच जर तुम्हाला कोळ्याच्या जाळ्यात तुमच्या नावाच्या अक्षराचा आकार किंवा स्वाक्षरी दिसली तर ते तुमच्यासाठी शुभ चिन्ह आहे. हे सूचित करते की तुम्हाला तुमच्या आगामी काळात काही मोठा नफा किंवा चांगली बातमी मिळेल. हे वाचा -  मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची असतात खास वैशिष्ट्ये; फक्त रागावर नियंत्रण ठेवा असेही मानले जाते की, तुम्हाला कोळी तुमच्या घरात जाळे विणताना दिसला तर ते तुमच्यासाठी लवकरच यशस्वी होण्याचे लक्षण आहे. अशा प्रकारे, कोळी दिसणे हे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती सुधारण्याचे आणि इतर लोकांकडून तुमचे कौतुक करण्याचे लक्षण आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात