जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची असतात खास वैशिष्ट्ये; फक्त रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे

मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची असतात खास वैशिष्ट्ये; फक्त रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे

मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची असतात खास वैशिष्ट्ये; फक्त रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे

ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात जन्मलेले लोक आकर्षक आणि लोकप्रिय असतात. त्याचबरोबर त्यांनी आयुष्यात काही करायचे ठरवले तर ते पूर्ण करतात. जाणून घेऊया मे महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल खास माहिती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 मे : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जन्माचा महिना, तारीख आणि राशिचक्रावरून व्यक्तीचा स्वभाव सांगता येतो. मे महिना सुरू झाला आहे. आज आपण भोपाळमध्ये राहणारे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, गुण आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेणार (May Born Person) आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात जन्मलेले लोक आकर्षक आणि लोकप्रिय असतात. त्याचबरोबर त्यांनी आयुष्यात काही करायचे ठरवले तर ते पूर्ण करतात. जाणून घेऊया मे महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल खास माहिती. - करिअर मे महिन्यात जन्मलेले लोक संगणक अभियंता, पत्रकार, पायलट किंवा प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात. त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते. या महिन्यात जन्मलेल्या मुलींना फॅशनचे चांगले ज्ञान असते. म्हणूनच ते फॅशनशी संबंधित उद्योगांमध्ये यशस्वी होऊ शकतात. - भरपूर कल्पनाशक्ती मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची कल्पनाशक्ती कमालीची असते. ते स्वभावाने उत्कट आणि लक्ष केंद्रित करणारे असतात. या महिन्यात जन्मलेल्या लोकांची बुद्धीही खूप कुशाग्र असते. ते आपल्या बुद्धीच्या जोरावर कोणतेही काम सहज सोडवू शकतात. हे वाचा -  सकाळी उठल्याबरोबर कधीही बघायच्या नसतात या गोष्टी; सगळा दिवस जातो खराब - कलेमध्ये रस मे महिन्यात जन्मलेले लोक साहित्य आणि कला प्रेमी असतात. ते त्यांचे काम कलात्मक पद्धतीने करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांना चित्रकला, नृत्य आणि गायन यात विशेष रस असतो. - रोमँटिक जीवन जगतात मे महिन्यात जन्मलेले लोक जीवनात रोमँटिक असतात. या महिन्यात जन्मलेले लोक शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली असतात आणि शुक्र ग्रह प्रेम आणि कामाचे प्रतिनिधित्व करतो. हे वाचा -  टाइप-2 डायबिटीजपासून ते BP पर्यंत अक्रोड खाण्याचे आहेत खास फायदे - नकारात्मक बाजू मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे काही नकारात्मक पैलू असतात. जसे की ते खूप हट्टी असू शकतात आणि खूप लवकर रागावतात, क्षणात राग येतो. त्यामुळे ही नकारात्मक बाजू त्यांच्या जीवनातील प्रगतीत कधी कधी अडथळे निर्माण करते. म्हणून, या महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी त्यांच्या नकारात्मक पैलूंवर विशेष लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात