Home /News /astrology /

Weekly Horoscope : हा आठवडा पावणार, गृह आणि वाहन सौख्य मिळण्याचे लाभ!

Weekly Horoscope : हा आठवडा पावणार, गृह आणि वाहन सौख्य मिळण्याचे लाभ!

आज दिनांक ८ मे २०२२. वार रविवार. तिथीवैशाख शुक्ल सप्तमी. भानुसप्तमी या आठवड्यात होणाऱ्या अनेक महत्वाच्या घटना म्हणजे रविचा कृत्तिका नक्षत्रात प्रवेश तसेच १० तारखेला बुध वक्री होणार आहे. आता काही काळ शनि मंगल कुंभेत एकत्र असतील.

पुढे वाचा ...
    आज दिनांक  ८ मे २०२२. वार रविवार. तिथीवैशाख शुक्ल सप्तमी. भानुसप्तमी या आठवड्यात होणाऱ्या अनेक महत्वाच्या घटना म्हणजे रविचा कृत्तिका नक्षत्रात  प्रवेश तसेच १० तारखेला बुध वक्री  होणार आहे. आता काही काळ शनि मंगल कुंभेत एकत्र असतील. सप्ताहाच्या शेवटी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्र गुरू मीन राशीत, राहू मेष तर केतू तुला राशीत आहे. चंद्र कर्क राशीत असून सर्वांना श्रींचा आशीर्वाद मिळो हीच सदिच्छा. आता पाहूया साप्ताहिक राशी भविष्य. मेष सप्ताहात राशी स्वामी मंगळ शनिसोबत  लाभस्थानात असून लवकरच तो मीनेत  जाईल.सप्ताहात मंगळाची फारशी फळे मिळणार नाहीत . गुरू शुक्र योग शुभ होतो आहे.त्यामुळे रोजच्या प्रमाणे शांततेत दिवस घालवा.  कार्यक्षेत्रात चांगला काळ असून येणाऱ्या संधीना समोर जा. चंद्र भ्रमण गृह सौख्य देणारे असून आर्थिक स्थितीत सुधारणा करेल.उंची वस्तूच्या खरेदीचे योग.प्रकृती चांगली राहील. सप्ताह शुभ आहे. वृषभ सप्ताहात शुक्र गुरू लाभात असून मंगल शनि दशम स्थानात आहे .आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. प्रवास,काही प्रकृतीच्या कुरबुरी असतील. बुध राशी स्थानात असून अतिशय हळू प्रगती होईल. कामात अडचणी येतील. दशमातील शनि मंगळ अधिकार प्राप्तीचे योग आणतील. राशीतील राहू मानसिक द्वंद्व निर्माण करेल.काहीसा संथ असा हा सप्ताह आहे. ग्रहबदल झाल्यानंतर मात्र घटनांची सुरवात होईल. मंगळ जप करावा. मिथुन हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी नेहमी सारखाच जाईल.काहीही विशेष घडणार नाही.मात्र सप्ताह अंत होणारे रवि गोचर तुम्हाला जपून राहण्याचा संकेत देत आहे  आर्थिक शारीरिक आणि सामाजिक जीवनात अनेक गोष्टींमुळे त्रास होईल .दान आणि उपासना करावी. गुरू शुभ असल्यामुळे भाग्यात वाढ होईल. एकूण पुढचा काळ हा शुभ आहे. कर्क चंद्र या सप्ताहात शुभ स्थानात असून घरामध्ये काही शुभ घटना घडतील.शत्रू नामोहरम होतील.शुक्र भाग्य स्थानात आहे. अष्टम  शनि मंगळ काळजी घ्यावी असे सुचवीत आहे. बुध संततीला काही अडचणी किंवा प्रकृतीचे त्रास दाखवीत आहे .मंगळ गोचर पुढचे काही दिवस काळजीचे आहेत हे लक्षात ठेवा.सप्ताह मिश्र फळ देईल. सिंह राशी स्वामी रवि  भाग्यस्थानात असून राज योग होत आहे. आर्थिक लाभ होतील. गुरू अष्टमात आहे पोटाचे त्रास होऊ शकतात. चंद्र भ्रमण शुभ असून जवळ पास प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात काही बदल संभवतात. जोडीदाराला काही मोठे लाभ होऊ शकतात. लवकरच आयुष्यात बदल घडण्याचे संकेत आहेत. सप्ताह शुभ. कन्या हा सप्ताह सर्व दृष्टीने संथ आणि काही विशेष ना घडता जाईल.रोजची काम कंटाळवाणी वाटतील.आर्थिक दृष्ट्या मात्र आठवडा चांगला जाईल.जवळपास फिरायला जाण्याचे योग येतील. संतती ही तुमची प्राथमिकता असेल.सप्तम गुरू विवाह योग निर्माण करील. शत्रू पिडा संभवते पण विजय तुमचाच होणार आहे. काळजी घ्या. सप्ताह अनुकूल. तुला पंचम स्थानातील मंगल  शनि प्रवास, संतती साठी काही खर्च असा योग आणेल. अविवाहित व्यक्तींना आकर्षक व्यक्ती भेटेल .गृह सुख मिळेल. आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. त्यांना वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी घर आणि वाहन यासंबंधी नवीन प्रस्ताव येतील.  आर्थिक दृष्ट्या सप्ताह अनुकूल राहील . वृश्चिक मंगळ आणि शनि कुटुंबात काही तणाव निर्माण करतील. मात्र फारशी हानी न करता त्यातून मार्ग काढतील. घर आणि वाहन घेण्या संबंधी हालचाल कराल. त्यात नक्की यश मिळेल. प्रकृती जपणे गरजेचे आहे. मनाला अकारण नीरस वाटेल. हवा बदल केल्याने फरक पडेल. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. योग आणि व्यायाम करा. सप्ताह मिश्र फळ देईल. धनु या आठवड्यात गेल्या काही दिवसापासून जाणवत असलेला मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल पण अनेक मार्गांनी पैसा येईल. चतुर्थ गुरू, पंचम सूर्य अतिशय शुभ असून भाग्याची वाढ करतील. पराक्रम आणि चिकाटीने तुम्ही प्रत्येक कामात यश मिळवाल. सप्ताहात अनेक शुभ फळं मिळतील. मकर धन स्थानात शनि मंगल आहे. अकस्मात होणाऱ्या घटना हे त्याचे फळ असेल. संतती वर विशेष लक्ष असू द्या. त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. मानसिक आरोग्य चिंता निर्माण होईल. तृतीय गुरू शुक्र लांबचे प्रवास योग आणतील. गृह आणि वाहन सौख्य मिळेल. सप्ताह शुभ. कुंभ राशि स्वामी शनि सध्या राशी स्थानात आहे.गुरू व शुक्र सर्व तऱ्हेने शुभता प्रदान करतील.सप्ताहाच्या शेवटी राशी स्थानात होणारा शनि मंगळ योग घातक ठरू शकतो. वाहन सांभाळून चालवा. आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या कठीण काळ आहे. कायद्याचे बंधन पाळा. शनि उपासना करणे योग्य ठरेल. सप्ताह मध्यम. मीन राशी स्वामी गुरू उदित आहे. एकूण शरीर तेजस्वी होईल. सूर्य डोळ्याची काळजी घ्या, अधिकारी व्यक्तींना नाराज करू नका असे सुचवीत आहे. सध्याचा काळ हा फार मोठ्या बदलांचा आहे. कुठलेही निर्णय घाईने घेऊ नका. विशेषतः नोकरी संबंधी सावध रहा. आर्थिक स्थिती ठीक राहील. व्ययस्थ शनि मंगळ तीव्र फळ देतील. एकूण सप्ताह मध्यम जाईल. शुभम भवतू!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या