मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /गर्भधारणेवेळी अडचणी येतात? तुम्हाला PCOS तर नाही ना, जाणून घ्या Pregnancy साठी कोणतं वय योग्य

गर्भधारणेवेळी अडचणी येतात? तुम्हाला PCOS तर नाही ना, जाणून घ्या Pregnancy साठी कोणतं वय योग्य

PCOS मुळे केवळ अनियमित मासिक पाळी, हार्मोनल असंतुलन होत नाही, तर स्त्रियांना या समस्येमुळे गर्भधारणेच्या वेळी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

PCOS मुळे केवळ अनियमित मासिक पाळी, हार्मोनल असंतुलन होत नाही, तर स्त्रियांना या समस्येमुळे गर्भधारणेच्या वेळी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

PCOS मुळे केवळ अनियमित मासिक पाळी, हार्मोनल असंतुलन होत नाही, तर स्त्रियांना या समस्येमुळे गर्भधारणेच्या वेळी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : महिलांमध्ये PCOS (Polycystic Ovary Syndrome) समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. भारतातील 5 पैकी एका महिलेवर याचा परिणाम होत असल्याचं दिसतं. महिलांमध्ये ही समस्या शक्यतो गरोदरपणातील वयात दिसत असल्याने याचा प्रजननक्षमतेवर तसच आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. PCOS मुळे केवळ अनियमित मासिक पाळी, हार्मोनल असंतुलन होत नाही, तर स्त्रियांना या समस्येमुळे गर्भधारणेच्या वेळी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

PCOS वर आतापर्यंत अनेक संशोधनं करण्यात आली. परंतु महिलांमध्ये या समस्येबाबत अतिशय कमी जागरुकता आहे. बऱ्याच स्त्रियांना आपल्याला PCOS ची समस्या आहे, हे समजतही नाही. अशा महिला ज्यावेळी गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात, त्यावेळी काही समस्यांचा सामना करावा लागल्यानंतर त्यांना याबाबतची माहिती मिळते.

PCOS ही हार्मोनल समस्या आहे. त्याचबरोबर महिलांमध्ये लठ्ठपणासारखीही समस्या असल्यास, गर्भधारणेमध्ये अशा स्त्रियांना नेहमीपेक्षा अधिक त्रास सहन करावा लागतो. PCOS मुळे मधुमेह, उच्च रक्तदाबसारखे आजारही होऊ शकतात.

PCOS समस्या असलेल्या महिलांसाठी गर्भवती होण्याचा उत्तम काळ -

PCOS समस्येवर योग्यवेळी निदान होणं गरजेचं आहे. निदान झालं नसेल आणि महिलेचं वय 30 वर्षाहून अधिक असेल, तर ही समस्या त्रासदायक ठरू शकते. वयाच्या 32व्या वर्षापासून प्रजनन पातळी कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. त्यानंतर वयाच्या 37व्या वर्षी यात अधिक घट होऊ शकते. PCOS असलेल्या स्त्रियांना गर्भधारणेसाठी सर्वाधिक नैसर्गिक शक्यता वयाच्या 35 वर्षापूर्वी राहते.

ताप डेंग्यूचा आहे की कोरोनाचा? या लक्षणांद्वारे ओळखून वेळीच करा उपचार

PCOS असल्यास गर्भधारणेची शक्यता कशी वाढवता येईल?

या समस्येवेळी गर्भवती होण्याच्या शक्यता वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे PCOS शी मुळापासून लढणं, समस्या संपूर्णपणे सोडवणं. काही स्त्रियांना गर्भधारणेसाठी कृत्रिम मदत IVF किंवा IUI अशा उपायांचीही गरज भासू शकते.

या गोष्टी ठरतील फायदेशीर -

- वजन कमी करणं

- चांगला आहार आणि उत्तम जीवनशैली

- नियमित व्यायाम

- केमिकलयुक्त गोष्टींचा मर्यादित वापर

- वारंवार लैंगिक संबंध ठेवणं

दोरी उड्या मारण्याचे आरोग्यासाठी आहेत इतके फायदे; आजच सुरू कराल हा व्यायाम

PCOS असताना गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणं -

अशा समस्येत गर्भधारणेची लक्षणं अनियमित किंवा अतिशय कमी दिसू शकतात. त्यामुळे सुरुवातीची लक्षणं ओळखणं कठीण ठरू शकतं. अशावेळी स्तन दुखणं, सतत थकवा येणं आणि डोकेदुखी ही लक्षणं प्रामुख्याने दिसू शकतात.

First published:
top videos

    Tags: Pregnancy, Women