5मुंबई, 14 ऑक्टोबर : स्मार्टफोनचा जमाना येण्याअगोदरपर्यंत अनेक मुलं शाळेत किंवा घरात दोरी उड्या (Skipping) मारायची. व्यायाम करतानाही अनेकजण दोरी उड्या मारायचे पण त्याचं प्रमाण अलिकडं कमी झाल्याचे दिसते.
मात्र, आजच्या युगात मुलांना दोरी उड्या मारण्यात रस नाही ते इनडोअर गेम्स (Game) आणि मोबाईलमध्ये व्हॉट्सअप स्टेटस बदलण्यात व्यग्र असतात. पण तरीही तुम्हाला उद्यानांमध्ये आणि जिममध्ये फिटनेससाठी बरेच तरुण दोरी उड्या मारताना दिसतील.
वास्तविक, जेव्हा तुम्ही लहानपणी दोरी उड्या मारत होता, तेव्हा आपण फक्त एक खेळ म्हणून त्याचा आनंद घ्यायचो. तेव्हा अनेकांना माहीत नव्हते की, दोरी उड्या मारणंदेखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण आजही असे बरेच लोक आहेत ज्यांना दोरी उडी मारण्याच्या फायद्यांविषयी माहिती नाही. तर आज आपण दोरी उड्या मारण्याचे काय फायदे (Skipping rope benefits for health) आहेत आणि या काळात आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेऊया.
दोरी उड्या मारण्याचे फायदे
दोरी उड्या मारल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी नियमितपणे पंधरा ते वीस मिनिटे दोरी उड्या मारल्या पाहिजेत.
रोज दहा मिनिटे दोरी उड्या मारल्याने रक्ताभिसरण सुधारते.
दोरी उड्या मारल्यानं हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.
दोरी उड्या मारण्यानं फुफ्फुसांना बळकटी मिळते आणि त्यांची कार्यक्षमता वाढते.
हे वाचा -
T20 World Cup नंतर कॅप्टन कोहलीच नाही तर टीम इंडियाचे खेळाडूही बदलणार; यांना मिळणार संधी!
नियमितपणे दोरी उड्या मारल्याने हृदयविकाराचा झटका आणि नैराश्यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.
दोरी उड्या मारल्यानं मुलांची उंची वाढण्यास मदत होते.
दोरी उड्या मारल्यानं हाडे मजबूत होतात आणि संतुलनामध्ये लक्ष केंद्रित करते.
दोरी उड्या मारताना या गोष्टी लक्षात ठेवा -
रिकाम्या पोटी दोरी उड्या कधीही मारू नये, यामुळे पोटात वेदना होऊ शकतात.
जेवणानंतर लगेच दोरी उड्या मारू नये, यासाठी जेवणानंतर सुमारे दोन तासांचा वेळ ठेवा.
व्यायाम करताना सुरुवातीला दोरी उड्या मारू नयेत. वॉर्म अप झाल्यानंतर दोरी उड्या मारणे योग्य ठरेल.
हे वाचा -
T20 World Cup मध्ये पाकिस्तानविरुद्ध कधीच आऊट झाला नाही हा भारतीय, तिन्ही वेळा मिळवून दिला विजय!
ज्या लोकांना दमा किंवा श्वसनाचा आजार आहे, त्यांनी दोरी उड्या मारू नयेत.
जे लोक हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्येने ग्रस्त आहेत त्यांनी दोरी उड्या मारू नये.
जे लोक ऑस्टियोपोरोसिस किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या हाडांशी संबंधित समस्येने ग्रस्त आहेत, त्यांनीही दोरी उड्या मारू नये.
ज्या लोकांना हर्निया आहे किंवा अलीकडे कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांनीही दोरीवर उडी मारू नये.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.