मुंबई 9 ऑक्टोबर : हल्ली हार्ट अटॅकमुळे अनेक लोक आपले प्राण गमावू लागले आहेत. ज्यामध्ये बहुतांश तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे लोकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता लोक नुकसतं छातीत दुखू लागलं तरी देखील त्यांना हृदयविकाराचा झटका येतोय काय? या विचाराने घाबरु लागले आहेत. कारण ते हृदयविकाराचे मुख्य लक्षण आहे. हृदयविकाराच्या झटक्याबाबत सर्वांनी सतर्क असालच हवं, यात काही शंका नाही, परंतू हे लक्षात घ्या की फक्त हृदय विकारानेच नाही, तर आणखी काही अशी कारणे असू शकतात ज्यामुळे तुमच्या छातीत दुखू शकतं. जे डॉक्टरांकडे गेल्यावर किंवा चाचणी केल्यानंतरच कळेल. त्यामुळे जास्त घाबरु नका. आता छातीत दुखण्यामागे इतर कोणती कारणे असू शकतात ते जाणून घेऊ या. हे ही वाचा : तुम्हालाही येते का अचानक चक्कर? त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणं 1. कोविड न्यूमोनिया कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या छातीत दुखू लागल्याने अनेक लोक कोविड न्यूमोनियाला बळी पडू लागले, म्हणजेच फुफ्फुसात संसर्ग झाल्यास न्यूमोनियाचा धोका असतो, त्यामुळे फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यांमध्ये सूज येते आणि नंतर त्यामुळे छातीत दुखते. 2. फुफ्फुसांचा संसर्ग कोरोना व्हायरसच्या काळात अनेक लोकांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता, त्यामुळे छातीत लोकांमध्ये दुखण्याच्या तक्रारी दिसू लागल्या होत्या. फुफ्फुसात इतर काही विषाणूंचाही हल्ला झाला तर छातीत दुखण्याची समस्या होऊ शकते. 3. कोरडा खोकला कोरड्या खोकल्यामुळे छातीच्या स्नायूंवर खूप ताण येतो, त्यामुळे हे स्नायू कमकुवत होतात आणि नंतर वेदना देखील होतात. खोकला लवकर बरा झाला नाही तर या वेदना वाढू शकतात. हे ही वाचा : Side Effects of Cucumber : यावेळी चुकूनही खाऊ नका काकडी, फायद्याऐवजी होईल नुकसान 4. पल्मोनरी एम्बोलिझम पल्मोनरी एम्बोलिझम ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामुळे छातीत दुखू शकते. हृदयाची समस्या ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी असते जी फुफ्फुसात रक्त वाहून नेते. अशा स्थितीत रक्त फुफ्फुसात व्यवस्थित पोहोचत नाही आणि तुम्हाला छातीत दुखू लागते. (विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.