मुंबई 9 ऑक्टोबर : निरोगी आरोग्यासाठी चांगला आहार घेणं महत्वाचं, यामुळे लठ्ठपण, तसेच अनेक आजारांपासून आपण लांब राहातो. ज्यामुळे शरीरासाठी महत्वाच्या असलेल्या घटकांचा नेहमीच आपल्या जेवणात समावेळ करा. काकडी ही आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. ती अनेकदा कोशिंबीर किंवा भाजी म्हणून आपण आपल्या आहारात त्याला समाविष्ठ करतो. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात, तसेच त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. परंतू कोणत्याही गोष्टीचा चुकीचा उपयोग हा आपल्याला त्याच्या फायद्यापेक्षा त्याचं नुकसानच जास्त करते आणि काकडीच्या बाबतीत देखील आपण अशी चुकतो. चला काकडीबद्दल काही माहिती घेऊ हे ही वाचा : दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढतं का? नेमकी माहिती जाणून घ्या आहारतज्ज्ञांच्या मते काकडी शरीरासाठी चांगली आहे, परंतू असा विचार करुन ती कोणत्याही वेळेवर खाऊ नये. काकडी नेहमी दिवसा खावी, ज्यामुळे शरीराला भरपूर पोषक द्रव्ये मिळतात, तर रात्रीचे सेवन केल्यास फायद्याऐवजी नुकसान होते. दिवसा काकडीचे सेवन केल्याने पोट भरलेले राहाते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, त्यात असलेल्या ९५ पाण्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवता येते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, कर्करोग रोखणे आणि मजबूत हाडे यांसारखे फायदे काकडीचे आहेत. चला काकडीमुळे होणारे नुकसान जाणून घेऊ हे ही वाचा : चेहऱ्यावर साय/मलई लावण्याचे आहेत हे 5 फायदे, महागड्या क्रीमही पडतात मागे 1. पचनावर परिणाम काकडीत Cucurbitacin असते जे तुमची पचनशक्ती मजबूत असेल तेव्हाच पचवता येते, अन्यथा पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. वास्तविक, रात्री काकडी खाल्ल्याने पोट जड होऊ लागते, मग तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोट फुगण्याची तक्रार होऊ शकते. त्यामुळे दिवसा काकडी खा. 2. झोपेवर परिणाम जर तुम्ही रात्री काकडी खाल्ल्यास शांत झोप लागणे कठीण होईल कारण पोट जड झाल्यामुळे झोपताना त्रास होतो, याशिवाय पचन बिघडले तर गॅसचाही त्रास होतो. ज्यामुळे तुमची झोप खराब होते आणि परिणामी आरोग्य खराब होतं. शिवाय काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला रात्री सारखी लघवी होईल, ज्यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते. (विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.