जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / तुम्हालाही येते का अचानक चक्कर? त्यामागे असू शकतात 'ही' कारणं

तुम्हालाही येते का अचानक चक्कर? त्यामागे असू शकतात 'ही' कारणं

चक्कर येणं

चक्कर येणं

उभ्या उभ्या चक्कर येण्यामागे काही कारणं असतात. त्यांबद्दल जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: चक्कर येणं ही खूप सर्वसाधारण गोष्ट आहे; मात्र हा गंभीर आजार नसला, तरी एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. काही जणांना उभ्या उभ्या चक्कर येते, अंथरूणावरून अचानक उठताना चक्कर येते. ही चक्कर किंवा थोडंसं गरगरणं काही सेकंदांसाठी असतं. त्यापेक्षा जास्त वेळ चक्कर आली, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच. अशा प्रकारे उभ्या उभ्या चक्कर येण्यामागे काही कारणं असतात. त्यांबद्दल जाणून घेऊ या. त्याविषयी माहिती देणारं सविस्तर वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. काही जणांना नेहमीच चक्कर येते. काहींना मात्र अचानक एखाद्या वेळी गरगरतं. अशा प्रकारे उभ्या उभ्या अचानक चक्कर जेव्हा येते, तेव्हा ती ऑर्थोस्टॅटिक किंवा पोश्चरल हायपोटेंशनमुळे येते. यामागे रक्तदाब कमी होण्याचं कारण असतं. बऱ्याचदा आपल्या शारीरिक स्थितीत अचानक बदल झाल्यामुळेही हे घडू शकतं. “कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला उभ्या उभ्या चक्कर येऊ शकते. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये ही सर्वसाधारण गोष्ट आहे. कारण वयामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या अशक्त झालेल्या असतात. रक्तवाहिन्या अशक्त झाल्यामुळे मेंदूतल्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही व हेच चक्कर येण्यामागचं कारण असतं; मात्र काही सेकंदांपेक्षा जास्त काळासाठी घेरी आली, तर ते गंभीर असू शकतं,” असं क्लिनिकस्पॉट्स होलिस्टिक हेल्थकेअरचे मेडिकल हेड डॉ. हरिकिरण चेकुरी यांचं म्हणणं आहे. हेही वाचा - दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढतं का? नेमकी माहिती जाणून घ्या उभ्या उभ्या घेरी येण्यामागे काही कारणं असू शकतात. मद्यपान दारूच्या व्यसनामुळे रक्तवाहिन्यांचं आकुंचन होतं. यामुळे रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी शरीराला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे अचानक उभं राहिल्यावर काही वेळेला चक्कर येऊ शकते. कॉफी पिऊन या समस्येवर उपाय शोधता येऊ शकतो. असं वारंवार होत असेल, तर रिकाम्यापोटी दारू पिणं टाळावं. दारूचं व्यसन सोडणं हा सर्वोत्तम उपाय ठरेल. पटकन उभं राहणं बसलेल्या किंवा झोपलेल्या अवस्थेत हृदयाला शरीरात रक्त पाठवण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत; मात्र उभं असताना हृदयाचे कष्ट वाढतात. शरीराचा समतोल साधण्यासाठी शारीरिक अवस्थेनुसार रक्दाब बदलत असतो. अशा वेळी जेव्हा शरीर एखाद्या ठराविक शारीरिक अवस्थेत असतं व अचानक ती शारीरिक स्थिती बदलते तेव्हा आतली यंत्रणा हादरते. अशा वेळी एखाद्या क्षणासाठी मेंदूचा रक्तपुरवठा थांबतो. जेव्हा आपण उभे राहतो, तेव्हा रक्त शरीराच्या खालच्या भागात साठलं जातं. ते संपूर्ण शरीरात पसरण्यासाठी काही सेकंदं लागू शकतात. त्या काळात रक्तदाब खाली-वर होतो. त्यामुळेच घेरी येते. तुम्हालाही उभं राहिल्यावर चक्कर येत असेल, तर उभं राहिल्यावर लगेचच काही हालचाल करू नका. शरीराला तोल साधण्यासाठी थोडा वेळ द्या. भिंतीचा आधार घेऊन बसा. रक्तदाब सुरळीत होण्यासाठी हात व डोकं खाली-वर करा. झोपेतून उठल्यावर एक भांडं पाणी प्या. म्हणजे शरीरातल्या पाण्याचं प्रमाण योग्य राहील. एखाद्या ठिकाणी खूप वेळ उभं राहायचं असेल, तरी हे करू शकता. खूप वेळ उभं राहिल्यानं पायात रक्त जमा होतं व पाय सूजतात. त्यामुळे ही गोष्ट शक्यतो टाळावी. उन्हामुळे उन्हाळ्यात पाणी कमी प्यायलं, तर चक्कर येऊ शकते. उन्हामुळे बाहेरचं तापमान वाढलेलं असतं. शरीराचंही तापमान जास्त असतं. अशा वेळी पाणी कमी प्यायलं, तर रक्तदाब कमी होतो व चक्कर येते. पुरेसं पाणी प्यायल्यानं रक्तदाब सुरळीत राहतो व चक्कर येण्याची शक्यता कमी होते. शारीरिक अस्वास्थ्य रक्तदाबाशी संबंधित गॅस्ट्रोइंटेस्टिनल आजार, कानाच्या आतल्या भागातले आजार, संप्रेरकांमधले बदल आदींमुळे उभं राहिल्यावर चक्कर किंवा भोवळ येऊ शकते. त्याशिवाय डायबेटिस, पार्किन्सन्स, डिमेंशिया, थायरॉइड, हृदयरोह यातही उभ्या उभ्या चक्कर येऊ शकते. कारण यातही रक्तदाब अचानक कमी होतो. अशा वेळी डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. पोश्चरल ऑर्थोस्टॅटिक टॅचिकार्डिया सिंड्रोम (POTS) पॉट्स (POTS) हा ऑर्थोस्टॅटिक इनटॉलरन्सचा एक प्रकार आहे. ऑर्थोस्टॅटिक इनटॉलरन्स म्हणजे उभं राहिल्यावर चक्कर येणे. ही समस्या असणाऱ्या व्यक्तींचं शरीर रक्तदाबाला स्वतःहून नियंत्रणात ठेवू शकत नाही. म्हणूनच शारीरिक स्थितीत बदल झाला, की लगेच चक्कर येऊ शकते. व्यायाम व्यायाम करताना हृदयातला रक्तप्रवाह वेगात होत असतो. थोडं थांबलं की पुन्हा नेहमीच्या वेगानं रक्तप्रवाह करण्याचा शरीर प्रयत्न करतं. यामुळे फुफ्फुसांवर ताण येतो. त्यामुळे व्यायाम केल्यावर किंवा उभं राहिल्यावर थोडी चक्कर येऊ शकते. जास्त मेहनतीचा व्यायाम केल्यावर काही वेळा डोळ्यांसमोर अंधारी येणं, अस्वस्थ वाटणं हे घडू शकतं. अशा वेळी थोडा वेळ बसावं. व्यायामाआधी भरपूर पाणी प्यावं. मधेमधेही थोडं पाणी प्यावं. हेही वाचा - नवा Blood Group सापडला; कशी होईल या रक्तगटाची ओळख? औषधं काही औषधांच्या सेवनामुळे रक्तदाब बदलतो व चक्कर येते. लघवी वाढण्यासाठीची डाययुरेटिक, हृदयरोगामध्ये दिली जाणारी बीटा ब्लॉकर्स आणि रक्तदाबाच्या नियंत्रणासाठीची ACE इन्हिबीटर या गोळ्यांमुळे चक्कर येऊ शकते. चक्कर येण्याचं कारण औषध असेल, तर लगेचच डॉक्टरांशी चर्चा करा. काही वेळा औषध अचानक बंद करण्यानंही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करू नका. जास्त वेळ उभं राहिल्यामुळे किंवा अचानक चक्कर येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेचच डॉक्टरांना दाखवा. एखाद्या औषधामुळे चक्कर येत असेल, तरी डॉक्टरांशी चर्चा करा. कोणताही आजार नसतानाही अचानक उभं राहिल्यावर भोवळ येणं, गरगरणं असं होत असेल, तर डॉक्टरांना दाखवा, असं अमेरिकेच्या मिशिगनमधल्या इयर इन्स्टिट्यूटमधे डॉक्टर एमी सरो यांचं म्हणणं आहे. अशा वेळी भरपूर पाणी पिणं, संतुलित आहार घेणं हे गरजेचं असतं. दिवसभरात 15 मिनिटांसाठी धावणं किंवा चालण्याचा व्यायाम करा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहील व घेरी येण्याची शक्यता कमी होईल. एकंदरीतच भोवळ येणं, चक्कर येणं हे वारंवार होत असेल किंवा अचानक उभं राहिल्यानं चक्कर येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात