Potato for health : बटाटा खाल्ल्यानं वजन वाढतंच असं नाही; या हेल्दी पद्धतीनं खाण्याचे आहेत फाय
व्हेगन डायटचे आहेत 3 प्रकार संपूर्ण अन्न व्हेगन डाएट - संपूर्ण अन्न आहारामध्ये संपूर्ण धान्य, फळे, भाज्या, नट आणि विविध प्रकारच्या बियांचा समावेश होतो. रॉ फूड व्हेगन डाएट - कच्च्या अन्नाचा आहार म्हणजे फळे, कच्च्या भाज्या, नट, बिया इत्यादींचा समावेश आहे. स्टार्च सोल्यूशन व्हेगन डाएट - स्टार्च आहारामध्ये कमी चरबीयुक्त आणि उच्च कार्बनयुक्त शाकाहारी खाद्यपदार्थांचा समावेश असतो. ज्यामध्ये फळांऐवजी बटाटे, तांदूळ आणि कॉर्न जास्त प्रमाणात वापरले जाते.Hand Care : भाजी चिरल्यामुळे रुक्ष-खडबडीत झालेत हात? या टिप्स वापरून बनवा मऊ आणि सुंद
व्हेगन डायटचे फायदे - व्हेगन डाएटमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. या आहारात अशा कोणत्याही पदार्थाचा समावेश नाही ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. - शाकाहारी आहारात फळे, भाज्या आणि काजू भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा ३ चे प्रमाण मुबलक असते. व्हेगन डायटचे पालन केल्याने नैराश्य आणि चिंताची समस्या दूर राहते. - या आहारामध्ये प्रोटीन आणि लोह भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील उर्जेची पातळी उच्च राहते आणि थकवा जाणवत नाही. त्याचबरोबर शरीर डिटॉक्सदेखील होते. - वजन कमी करण्यासाठी हा आहार सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. ज्यामुळे शरीराला कॅलरीज मिळतात पण फॅट जमा होत नाही. निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी व्हेगन डाएट प्रभावी आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health Tips, Lifestyle, Vegan, Vegetables