Home /News /lifestyle /

Hand Care : भाजी चिरल्यामुळे रुक्ष-खडबडीत झालेत हात? या टिप्स वापरून बनवा मऊ आणि सुंदर

Hand Care : भाजी चिरल्यामुळे रुक्ष-खडबडीत झालेत हात? या टिप्स वापरून बनवा मऊ आणि सुंदर

भाजी चिरल्यानंतर तुमचे हात सोलले जातात आणि खडबडीत होतात. हातांना स्पर्श केल्यावर जर तुम्हाला खडबडीत त्वचा जाणवत असेल तर या पद्धतीने तुमचे हात मऊ आणि सुंदर होऊ शकतात.

    मुंबई 29 जून : सुंदर हात तुमचे व्यक्तिमत्व वाढवण्याचे काम करतात. पण हात रुक्ष (Rough Hands) होऊ लागल्यावर त्वचेला जखमा होतात आणि कोरडेपणा येतो. ते आणखी वाईट दिसू लागते. काही लोकांचे मत आहे की ही समस्या फक्त पाण्याची आहे. पण तसे नाही. भाजी चिरल्यामुळेदेखील हा त्रास होतो. घरातील महिलांना अनेकदा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. भाजी चिरल्यानंतर काही जणींचे हात कापले जातात, काहींच्या हाताला भेगा पडू लागतात तर काहींचे हात रुक्ष होतात. याशिवाय पुरळ उठणे, इरिटेशन होणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे हातांच्या त्वचेचे (Hand Skin Irritation) नुकसान होते. त्याचबरोबर भेगा पडलेल्या हातांची त्वचा हळूहळू काळी पडू लागते. अशा परिस्थितीत, त्याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढूही शकते. काही स्त्रिया यापासून मुक्त होण्यासाठी क्रीम वापरतात. तरीही संवेदनशील त्वचा असलेले लोक हा पर्याय वापरण्यास घाबरतात. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे वापरून तुम्ही तुमच्या हातांची यथोचित कजय घेऊ शकता. तसेच ते त्यांना मऊ आणि सुंदर बनवू शकता. ऑलिव्ह ऑईलचा वापर करा काही भाज्या निवडल्यानंतर आणि चिरल्यानंतर त्वचा कोरडी पडू लागते आणि हाताची त्वचा बाहेर येऊ लागते. अशा स्थितीत पुन्हा पुन्हा साबण वापरण्याची गरज नाही. त्याऐवजी नियमित पाण्याने आपले हात धुवा आणि हातांवर ऑलिव्ह ऑइल (Use Olive Oil) लावा. एकदा किंवा दोनदा तेल लावले की हातांची मऊ होऊ लागते. Garlic Benefits : पोट वाढलंय? व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय? मग अशा पद्धीतीने खा लसूण रात्री झोपताना हाताला लावा व्हॅसलिन भाज्या चिरल्यानंतर तुमचे हात नेहमी कोरडे राहतात. त्यामुळे रोज रात्री झोपताना व्हॅसलीन (Use Vaseline) लावा. जर तुम्ही व्हॅसलीन वापरत असाल तर तुम्हाला दुसरे काहीही वापरावे लागणार नाही. यासाठी थोड्या प्रमाणात व्हॅसलीन घ्या आणि हातांवर हळुवार मसाज करा. सकाळी तुमच्या हातातील फरक तुम्हाला जाणवेल. हाताला खाज आणि पुरळ येत असल्यास मोहरीचे तेल लावा काही भाज्यांमुळे हातांना खाज आणि पुरळ येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत प्रथम हाताला मोहरीचे तेल (Use Mustard Oil) लावा आणि मग कामाला सुरुवात करा. मोहरीचे तेल कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. शिवाय ते हातांची त्वचादेखील मऊ ठेवते. दही आणि ओटचे स्क्रब केवळ चेहराच नाही तर हातही स्क्रब करावे लागतात. खरं तर, आपण दिवसभर विविध गोष्टी करतो. तसेच आपले हात अनेकदा पाण्यात बुडलेले असतात. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा किंवा क्रॅक येणे स्वाभाविक आहे. शिवाय त्वचेचा मृत (Hand Scrub) थर जमा झालेला असतो. या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी स्क्रबिंग आवश्यक आहे. स्क्रबसाठी ओटचे जाडे भरडे पीठ आणि दही यांची पेस्ट तयार करा आणि ती हातांवर लावून हातांचे स्क्रब करा. Health Tips : काही आजारांपूर्वी तुमचे पाय देतात 'हे' संकेत, वेळीच व्हायला हवे सावध ग्लिसरीन असलेला साबण वापरा हात धुणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची गरज नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही रफ साबण वापरावा. तुम्ही चेहऱ्याप्रमाणे हातांच्या त्वचेचीही काळजी घेतली पाहिजे. ग्लिसरीनवर आधारित साबण (Use Glycerin Base Soap) हात धुण्यासाठी वापरा. यामुळे ते कोरडे होणार नाही.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या