मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Potato for health : बटाटा खाल्ल्यानं वजन वाढतंच असं नाही; या हेल्दी पद्धतीनं खाण्याचे आहेत फायदे

Potato for health : बटाटा खाल्ल्यानं वजन वाढतंच असं नाही; या हेल्दी पद्धतीनं खाण्याचे आहेत फायदे

बटाट्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतं. यामध्ये फायबर देखील असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बटाट्याचे सेवन पचनासाठीही फायदेशीर आहे. तसंच याच्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

बटाट्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतं. यामध्ये फायबर देखील असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बटाट्याचे सेवन पचनासाठीही फायदेशीर आहे. तसंच याच्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

बटाट्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतं. यामध्ये फायबर देखील असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बटाट्याचे सेवन पचनासाठीही फायदेशीर आहे. तसंच याच्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 29 जून : बटाटा ही आपल्या देशातील अशी भाजी आहे, जी कोणत्याही भाजीसोबत वापरता येते. त्यामुळे बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटलं जातं. बटाट्याचे विविध पदार्थ खूप स्वादिष्ट असतात. मग आलू टिक्कीची देशी चव असो किंवा आलू टिक्की बर्गरची विदेशी चव असो. बटाटा हा प्रत्येक खाद्यपदार्थात टेम्परिंग एजंट म्हणून काम करतो. परंतु, तरीही लोक बटाट्याला रोगाचं मूळ म्हणतात. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी बटाटा घातक (Potato For Weight Control) मानला जातो. बटाट्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतं. यामध्ये फायबर देखील असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बटाट्याचे सेवन पचनासाठीही फायदेशीर आहे. तसंच याच्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात. हे हायपोग्लायसेमिक इंडेक्स कमी करतात, असं हेल्थलाइनने म्हटलं आहे. बटाटे खाण्याचा निरोगी मार्ग उकडलेले बटाटे आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. बटाटे उकडल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर त्यांचे तुकडे करा. उकडलेल्या बटाट्याची चव वाढवण्यासाठी काळी मिरी वापरता येऊ शकते. बटाटा दही किंवा ताकात मिसळून नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात खाल्ल्यानेही फायदा होतो. उकडलेल्या बटाट्याचं सेवन वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतं. उकडलेला बटाटा आहाराचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतो उकडलेले बटाटे खाल्ल्यानं जास्त प्रमाणात आहार घेणं किंवा एकूणच खाणं कमी प्रमाणात होतं. हे खाल्ल्याने पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. उकडलेले थंड बटाटे जास्त प्रमाणात प्रतिरोधक स्टार्च तयार करतात. हे चयापचय वाढवण्यास मदत करते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. उकडलेल्या बटाट्यांमध्ये रताळ्यांइतक्याच कॅलरीज असतात. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार पोषक घटक बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. त्यात फॅट, सोडियम किंवा कोलेस्टेरॉल नसतं. याशिवाय, व्हिटॅमिन बी 6, फायबर, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण चांगलं असतं. केळीपेक्षा बटाट्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. तसंच, त्यात आपल्या दैनंदिन गरजेच्या जवळपास निम्मं व्हिटॅमिन सी असतं. बटाट्यामध्ये फ्री रॅडिकल्सशी लढण्याची क्षमता असल्यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. बटाटे कमी पाण्यात उकडावेत बटाटे उकडण्यासाठी कमी पाणी वापरा. शिजवलेल्या बटाट्यामध्ये पोषक तत्त्वं चांगल्या प्रमाणात असतात. ते खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. बटाटे उकडलेलं पाणीही जेवणात वापरण्याचा प्रयत्न करा. या पाण्यात बटाट्यातील व्हिटॅमिन सी आणि बी सारखे पोषक घटक आलेले असतात. ते पाणी फेकून दिल्यास त्यातील घटक आपल्याला मिळत नाहीत. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम या गोष्टींसोबत खाणं टाळा बटाट्यांसोबत तूप, तेल, लोणी, मलई, पनीर आणि आर्टिफिशियल फ्लेवर्सचा जास्त वापर करू नका. बटाटे शिजवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलसारखं निरोगी तेल वापरा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या