मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Thyroid Tips : थायरॉइडमुळे वजन कमी करता येत नसेल तर टेंशन घेऊ नका, फॉलो करा या टिप्स

Thyroid Tips : थायरॉइडमुळे वजन कमी करता येत नसेल तर टेंशन घेऊ नका, फॉलो करा या टिप्स

शरीर निरोगी ठेवण्यासाठी थायरॉईडडी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. थायरॉईडची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला प्रभावित करू शकते. यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी थायरॉईडडी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. थायरॉईडची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला प्रभावित करू शकते. यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी थायरॉईडडी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. थायरॉईडची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला प्रभावित करू शकते. यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 13 डिसेंबर : थायरॉईड ही आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रिया योग्य ठेवण्यासाठी कार्य करणारी एक महत्त्वाची ग्रंथी आहे. ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी थायरॉईडडी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. थायरॉईडची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला प्रभावित करू शकते.

थायरॉइडमुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. तुम्हालाही या थायरॉइडमुळे वजन कमी करता येत नसेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या पोषक घटकांविषयी माहिती देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

Weight Loss Tips : वजन कमी करताना पोळी खावी की नाही? वाचा काय म्हणतात आहारतज्ज्ञ

वजन कमी करण्यासाठी थायरॉइडच्या रुग्णांनी करा हे उपाय

1) वजन कमी करण्यासाठी थायरॉइडच्या रुग्णांनी आहारात अँटी-इन्फ्लामेटरी पदार्थांचा समावेश करावा. अँटी-इन्फ्लामेटरी फूट्स ऑटोइम्यून फंक्शन संतुलित ठेवण्यास मदत करतात. तसेच यामुळे थायरॉईडचा प्रभाव कमी होतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.

2) थायरॉइडच्या रुग्णांनी आहारात आयोडीनचे प्रमाण वाढवावे. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईड रुग्णांमध्ये चयापचय मंदावते. हेल्थ शॉट्सने दिलेल्या माहितीनुसार रिसर्चगेटने प्रकाशित केलेल्या अभ्यासात थायरॉईडच्या रुग्णांनी वजन वाढू नये म्हणून नियमित आहारात आयोडीनचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिला आहे. पुरेशा प्रमाणात आयोडीन खाल्ल्याने शरीरात थायरॉईड उत्तेजक संप्रेरकांचे उत्पादन वाढते.

3) सेलेनियमने समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. सेलेनियममुळे शरीरात टीएसएच (Thyroid stimulating hormone) निर्माण होते. तसेच पुरेशा प्रमाणात सेलेनियमचे मिळाल्यास शरीराला रॅडिकल्सपासून मुक्त राहते आणि थायरॉईड दरम्यान वजन कमी करण्यास मदत होते. सेलेनियममुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.

Weight Loss : एक्सरसाइज किंवा स्ट्रिक्ट डाएटशिवाय वजन कमी करायचंय? मग फॉलो करा या 5 टिप्स

4) वजन कमी करण्यासाठी थायरॉईडच्या रुग्णांनी आहारात पुरेशा प्रमाणात फायबरचा समावेश टकरावा. फायबर हे पचन आणि उत्तम चयापचयासाठी सर्वात महत्वाचे पोषक घटक आहे. आहारात फायबरयुक्त अन्नाचा समावेश केल्याने पचनक्रिया संतुलित राहते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास महत होते. यासाठी तुम्ही आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश करू शकता.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight