मुंबई, 4 डिसेंबर : आजकाल खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयीमुळे बहुतेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. लठ्ठपणा अनेक आजार उद्भवण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे अनेक जण वजन कमी करण्यासाठी आणि फीट होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण व्यायाम आणि कठोर शरीरश्रम करतात, तर काहीजण आहारत बदल करून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात.
वजन कमी करताना आहारात कोणते पदार्थ असावे आणि नसावे हा प्रश्न नेहमी प्रश्न अनेकांना पडत असतो. तसेच डायटिंग करताना पोळी खावी की नाही अशी शंका देखील अनेकांच्या मनात असते. तुम्हालाही ही शंका असेल आणि तुम्ही संभ्रमात असाल तर तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर आहे. या लेखात आपण पोळीबाबत आहारतज्ज्ञांच मत काय आहे ते जाणून घेणार आहोत. झी न्यूज हिंदीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
Weight Loss : एक्सरसाइज किंवा स्ट्रिक्ट डाएटशिवाय वजन कमी करायचंय? मग फॉलो करा या 5 टिप्स
वजन कमी करताना पोळी खावी का?
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक गव्हाची पोळी खाणे टाळतात, कारण त्यात कार्बोहायड्रेट्स असतात. परंतु गव्हाची पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. याबाबत आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ रिचाने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने गव्हाची पोळी खाण्याचे फायदे सांगितले आहेत. तसेच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही पोळी सर्वोत्तम पर्याय असल्याचेही तिने सांगितले, कारण यात कमी-कॅलरी असतात.
पोळी का खावी?
डॉ. रिचा यांच्या मते मध्यम आकाराच्या पोळीचे वजन सुमारे 40 ग्रॅम असते आणि त्यात 120 कॅलरीज असतात. तसेच या रोटीमध्ये शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी प्रभावी ठरणारे व्हिटॅमिन बी 1 असते जे अँटीऑक्सिडंट म्हणून ही काम करते. तुम्ही मल्टीग्रेन पोळी खाल्ल्यास त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ती खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही. त्यामुळे मधुमेही रुग्णही मल्टीग्रेन पोळी खाऊ शकतात.
80/20 चा नियम वापरून महिलेनं वयाच्या सत्तरीत कमी केलं 50 किलो वजन; काय आहे हा रूल?
एका दिवसात किती पोळ्या खाव्या?
पुरुषांना एका दिवसात सुमारे 1700 कॅलरीजची आवश्यकता असते. त्यामुळे ते दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात तीन पोळ्या खाऊ शकतात. तर महिलांना एका दिवसात 1400 कॅलरीजची आवश्यकता असते. त्यामुळे त्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात दोन पोळ्या खाऊ शकतात. याशिवाय भाजी आणि कोशिंबीरही रोटीसोबत घ्यावी. त्यामुळे अधिक फायदा होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips