मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Weight Loss : एक्सरसाइज किंवा स्ट्रिक्ट डाएटशिवाय वजन कमी करायचंय? मग फॉलो करा या 5 टिप्स

Weight Loss : एक्सरसाइज किंवा स्ट्रिक्ट डाएटशिवाय वजन कमी करायचंय? मग फॉलो करा या 5 टिप्स

जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी निरोगी आणि संतुलित आहार घ्यायला हवा. तसेच नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. मात्र प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्तीला हे शक्य होत नाही. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही वजन कमी करण्याचा प्रवास सोपा करू शकता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 3 डिसेंबर : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनियमित जीवनशैली ही जगभरातील व्यक्तींसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या खूप वाढते आहे. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी निरोगी आणि संतुलित आहार घ्यायला हवा. तसेच नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. मात्र प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्तीला हे शक्य होत नाही. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही वजन कमी करण्याचा प्रवास सोपा करू शकता.

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत 80 टक्के आहार आणि 20 टक्के व्यायाम असतो असे अनेकदा म्हटले जाते. आपण आपल्या आहारात आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडा बदल करून वजन कमी करू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्या फॉलो केल्यास तुम्ही स्ट्रिक्ट डाएट किंवा व्यायाम न करताही वजन करू शकता.

पोटात गॅस होतोय? हे सोपे उपाय कराल तर कायमचा कमी होईल त्रास

वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

1. मैद्यापासून दूर राहा : वजन कमी करण्यासाठी मैदा, व्हाईट ब्रेड, पास्ता आणि इतर रिफाईंड कार्ब्सपासून दूर राहा. मैद्याऐवजी कोंडा असलेले पीठ वापरू शकता. हे तुम्हाला तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करेल.

2. कोमट पाणी प्या : नेहमी भरपूर पाणी प्यावे. कारण पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. सामान्य-तापमानातील पाण्याच्या विपरीत, कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अधिक चरबी कमी होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने तुमचे चयापचय वाढण्यास मदत होते, त्यामुळे निरोगी वजन कमी होण्यास मदत होते.

3. मिठाई टाळा : वजन कमी करण्याच्या प्रवासात साखर टाळण्याचा सल्ला दिला जातो. साखरेचे सेवन केल्याने चयापचयाशी संबंधित आजार होतात आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीराच्या वजनावर होतो. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या साखरेच्या सेवनावर लक्ष ठेवा. जर तुम्हाला गोड खाण्याची खूपच इच्छा होत असेल तर तुम्ही साखरेच्या जागी गूळ किंवा मध घेऊ शकता.

4. ग्रीन टी घ्या : वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. म्हणून जर तुम्हाला जास्तीचे वजन कमी करायचे असेल, तर नियमितपणे दोन कप ग्रीन टी प्या. हे केवळ तुमची चयापचय वाढवत नाही तर डिटॉक्सिफिकेशनमध्ये देखील मदत करते.

5. रिफाइंड तेलाचा वापर कमी करा : तेल टाळण्याचा प्रयत्न करा, विशेषतः अन्न शिजवताना रिफाइंड तेलाचा वापर. त्याऐवजी तुम्ही मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल किंवा राईस ब्रॅन तेल वापरू शकता. रिफाइंड तेलाच्या वापरामुळे वजन कमी होण्याऐवजी ते आणखी वाढू शकते.

80/20 चा नियम वापरून महिलेनं वयाच्या सत्तरीत कमी केलं 50 किलो वजन; काय आहे हा रूल?

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips