मुंबई, 03 नोव्हेंबर : हल्लीच्या काळात आपले आरोग्य सांभाळणे आणि त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे खूप आवश्यक आहे. आनंदी आयुष्य जगण्यासाठी निरोगी शरीर आणि नियंत्रित वजन या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यासाठी आता लोक खूप प्रयत्नही करतात. खाण्यापिण्याच्या सवयीनमध्ये बदल करतात, व्यायाम-योगासनं करतात. मात्र एवढे करूनही काही व्यक्तींना आपले वजन कमी करण्यात समस्या येतात किंवा काही लोकांना अगदी कमी वेळेत आपले खूप वजन कमी करायचे असते.
आज आम्ही तुम्हाला अशाच एक डॉक्टरबद्दल माहिती देणार आहोत. ज्यांनी चहा पिऊन 30 किलो वजन कमी केले आहे. या डॉक्टराने वजन कमी करण्याच्या त्यांच्या प्रवासाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी कोणता आहार घेतला आणि कोणते वर्कआउट रूटीन फॉलो केले याबद्दल माहिती दिली.
विराट कोहलीसारखं डाएट फॉलो करायचंय? 'या' पदार्थांचा करा आहारामध्ये समावेश
या डॉक्टरचे नाव डॉ. कश्मी शर्मा आहे. त्या ऋषिकेशच्या राहणाऱ्या असून त्या एमबीबीएस, एमडी डॉक्टर आहेत. त्यांचे आधीचे वजन 85 किलो होते. तर सध्या त्यांचे वजन 55 किलो आहे. वजन कमी करण्यासाठी कश्मी यांनी खाणे पिणे न सोडता कॅलरी मोजून प्रमाणबद्ध पद्धतीने आहार घेतला. त्या रोज 2-3 कप चहादेखील घ्यायच्या आणि प्रत्येक वीकेंडला आईस्क्रीमचा आनंददेखील घेतला.
कसा होता कश्मी यांचा 85 ते 55 किलो पर्यंतचा प्रवास
आज तकशी बोलताना डॉ. कश्मी शर्मा म्हणतात, “मला 2 मुलं आहेत आणि गर्भधारणेनंतर माझे वजन इतके वाढले होते की पाठदुखी सुरू झाली आणि डिस्कमध्येही समस्या सुरू झाली. माझे मूल मोठे होताच, मी माझे वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. जर मी हे करू शकलो नाही तर मी माझ्या मुलाची योग्य काळजी घेऊ शकणार नाही.
डॉ. कश्मी शर्मा म्हणाल्या, “वजन कमी करण्यासाठी मी यूट्यूब बघून वजन कमी करायला सुरुवात केली आणि माझ्या गुडघ्याचे लिगामेंट तुटले. यानंतर ACL शस्त्रक्रिया झाली आणि मी बेड रेस्टवर होते. बरी होताच, मी फिटरकडून एक प्रशिक्षक घेतला आणि माझा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू झाला. मला समजले की मी वजन कमी करण्यासाठी आधी सुरू केलेली प्रक्रिया चुकीची होती. पण मी कोचच्या देखरेखीखाली येताच, त्यांनी माझा डाएट आणि वर्कआउट प्लॅन तयार केला आणि हळूहळू माझे वजन कमी होऊ लागले. असे करत 18 महिन्यांत माझे वजन 30 किलो कमी झाले. आज मी स्वतः एक प्रमाणित पोषण तज्ञ आहे.
कंबर स्लीम बनवायची असेल तर नाश्त्यात करा हे 5 बदल, लगेच फरक दिसू लागेल
डॉ. कश्मी शर्मा पुढे म्हणाल्या, “वजन कमी करण्यासाठी मी वेळोवेळी कॅलरीज वाढवत आणि कमी करत राहिले. मी काही वेळा 1500-1600 कॅलरीज आणि काही वेळा 2500 कॅलरी देखील घेतल्या. मला चहाची खूप आवड आहे. मी रोज किमान 2-3 कप चहा प्यायचे आणि आठवड्यातून एकदा आईस्क्रीमही खायचे. वजन कमी करण्यासाठी मी बहुतेक वेळा फॉलो केलेला आहार खालीलप्रमाणे होता.”
View this post on Instagram
वजन कमी करण्यासाठी कश्मी यांनी घेतला असा आहार
नाश्ता : 150 मिली कमी चरबीयुक्त दूध, 50 ग्रॅम पनीर, 50 ग्रॅम भात किंवा पोहे, 5 ग्रॅम तूप.
दुपारचे जेवण : 150 ग्रॅम भाज्या, 30 ग्रॅम डाळी, 50 ग्रॅम गव्हाचे पीठ (पोळ्या), 5 ग्रॅम तूप.
संध्याकाळचा नाश्ता : 1 स्कूप व्हे प्रोटीन, 150 ग्रॅम फळे, 1 तुकडा चीज, 1 स्लाईस ब्रेड, 100 मिली लो फॅट दूध,
रात्रीचे जेवण : 40 ग्रॅम भात किंवा पोहे, 5 ग्रॅम तूप, 150 ग्रॅम भाज्या, 100 ग्रॅम कॉटेज चीज.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tea, Weight loss tips