Home /News /lifestyle /

ज्याच्याशी केलं ब्रेकअप त्याने Tokyo Olympic मध्ये जिंकलं मेडल; आता तरुणीला होतोय पश्चाताप

ज्याच्याशी केलं ब्रेकअप त्याने Tokyo Olympic मध्ये जिंकलं मेडल; आता तरुणीला होतोय पश्चाताप

Tokyo Olympic 2021 : जो कधी तिचा हिरो होता तो आज संपूर्ण देशाचा हिरो बनला आहे.

    टोकियो, 27 जुलै : कोणताही निर्णय घाईत किंवा रागात घेणं कधीच चांगलं नसतं. हेच ब्रेअकपच्या बाबतीही लागू होतं. किती तरी तरुण-तरुणी छोट्या छोट्या कारणावरून ब्रेकअप (Breakup) करतात. पण नंतर मात्र याचा मोठा पश्चाताप होतो. सध्या याच परिस्थितीतून जाते आहे ती न्यूझीलंडमधील एक तरुणी. ज्याच्याशी तिने ब्रेकअप केलं तो तिचा हिरो आज देशाचा हिरो बनला आहे. त्यानंतर आपण ब्रेकअप करून खूप मोठी चूक केली असं तिला वाटतं आहे. न्यूझीलंडचा (New zealand) हेडन वाइल्ड (Triathlete Hayden Wilde) ज्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) ट्रायथलॉनमध्ये कांस्यपदक जिंकलं आहे. या खेळातील न्यूझीलंडचं हे पहिलं पदक. त्यामुळे देशभरात उत्साह होता. पण एक तरुणी मात्र निराश होती. ही तरुणी म्हणजे वाइल्डची एक्स-गर्लफ्रेंड. हे वाचा - एका चिठ्ठीने उलगडलं 'बाथरूम सिक्रेट'; वाचूनच महिलेला फुटला घाम वाइल्डसोबत या तरुणीने काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप केलं. मीडिया  रिपोर्टनुसार 1News चॅनेलशी बोलताना या तरुणीने सांगितलं,  मी त्याच्यासोबत शाळेत जायचे. आता तो खूप मोठा झाला आहे आणि मला याचा अभिमान आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने जे काम केलं ते अद्भुत आहे. वाइल्डसोबत नातं तोडलं याचा आता पश्चाताप होतो आहे. हे वाचा - 6 महिन्यांपूर्वी सर्वात श्रीमंताच्या यादीत असलेला तो आज अब्जाधीशही नाही कारण... स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं म्हणजे काय असतं, याचा अनुभव ही तरुणी घेत आहे. आता तिच्या या प्रतिक्रियेनंतर तिचा एक्स-बॉयफ्रेंड काय प्रतिक्रिया देतो याचीही उत्सुकता सर्वांना आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Breakup, Lifestyle, Love story, Olympic, Olympics 2021, Relationship, Sports, Tokyo

    पुढील बातम्या