मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /काहीही! नवऱ्याला मंडपातच नवरीला द्यावी लागते इनरविअर; लग्नाची विचित्र परंपरा

काहीही! नवऱ्याला मंडपातच नवरीला द्यावी लागते इनरविअर; लग्नाची विचित्र परंपरा

नवरीच्या अंडरगार्मेंट्सवरून लग्नात राडाही होतो.

नवरीच्या अंडरगार्मेंट्सवरून लग्नात राडाही होतो.

नवरीच्या अंडरगार्मेंट्सवरून लग्नात राडाही होतो.

बीजिंग, 27 जुलै : लग्न (Wedding) म्हटलं की बस्ता आलाच. नवरा-नवरीची खास ड्रेस (Wedding dress)  खरेदी केले जातात. बहुतेक ठिकाणी नवरीकडून (Bride dress) नवऱ्याला (Groom dress) आणि नवऱ्याकडून नवरीला लग्नाचा ड्रेस दिला जातो. याशिवाय दागिने, चपला हेसुद्धा आलंच. पण तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये नवरीला फक्त लग्नाचा ड्रेस, ज्वेलरी किंवा चपल नाही तर चक्क इनरविअरही द्यावे लागतात (Groom bring undergarment for bride) आणि विशेष म्हणजे नवरीसाठी हे अंडरगार्मेंट्स नवऱ्यालाच खरेदी करावे लागतात.

चीनमध्ये लग्नाची ही विचित्र परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे. इथं नवरदेवाच्या कुटुंबाला नववधूसाठी लग्नात प्रत्येक सामान आणावं लागतं. त्यात अंडरगार्मेंट्सचाही समावेश आहे. हे सामान खरेदी करण्यासाठी नवरदेवासह त्याचं कुटुंब जातं. पण अंडरगार्मेंट्स मात्र नवऱ्यालाच खरेदी करावे लागतात.

हे वाचा - ज्याच्याशी ब्रेकअप केलं त्याने Tokyo Olympic मेडल जिंकलं; तरुणीला होतोय पश्चाताप

याच अंडरगार्मेंट्सवरून लग्नात राडाही होतो. अंडरगार्मेंट्स न देणं किंवा त्याचा आकार लहान मोठा असणं यावरून लग्नही तुटतं. मानपान, पाहुणाचार, लग्नाची खरेदी, हुंडा किंवा प्रेमप्रकरण यावरून लग्न तुटणं हे तुमच्यासाठी नवीन नाही. पण अंडरगार्मेंटवरून लग्न तुटणं हे तुम्हाला थोडं विचित्रच वाटलं असेल. पण इथं हे गांभीर्याने घेतलं जातं. अशी काही प्रकरणं चीनमध्ये घडली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच असं एक प्रकरण समोर आलं होतं. जे सोशल मीडियावर व्हायरलही झालं होतं. नवरीला लहान आकाराचे अंडरगार्मेंट्स दिल्याने लग्न मोडलं होतं.

हे वाचा - वर्षभर प्रयत्न करून झाली नाही गर्भधारणा; पतीचं खरं रूप समोर येताच घेतला घटस्फोट

चीनमध्ये या विचित्र परंपरेवरून वाद सुरू आहेत. काही लोक या प्रथेसोबत आहेत तर काही जण या प्रथेला विरोधही करतात.

First published:

Tags: China, Viral, Wedding