Home /News /lifestyle /

Coronavirus: आहारात हे Vitamin असेल तर कमी होतो हे कोरोनाचा धोका?

Coronavirus: आहारात हे Vitamin असेल तर कमी होतो हे कोरोनाचा धोका?

कोरोना विषाणूपासून बचाव (Fight against Corona Infection) करायचा असेल तर शरीरात या जीवनसत्वाची कमतरता नको. खूप कमी पदार्थांतून हे Vitamin मिळतं, वाचा नवा रिसर्च काय सांगतो.

    दिल्ली, 20 सप्टेंबर : कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे (Fights Corona Infection) लोकांच्या आरोग्यावर याचा हानीकारक प्रभाव झाला असून आता कोरोनाचा प्रभाव जरी कमी झालेला असला तरीही त्याचे संक्रमण होऊ नये, यासाठी थोडा आहार पण जाणीवपूर्वर बदलायला हवा. कोरोनासहित डेंग्यूचेही (Dengue cases in Maharashtra) संक्रमण वाढत असल्याने आता लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनापासून (Vitamin D minimizes Coronavirus risk)आपला बचाव करण्यासाठी लोकांनी आपल्या आहारात बदल केला असून आपल्या शरीराला निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्या आहारात विविध पोषकतत्व असलेले अन्नपदार्थ घेत आहेत. परंतु तुम्हाला जर कोरोनाचे संक्रमण टाळायचं असेल तर त्यासाठी शरीरात व्हिटॅमिन डी (Vitamin D) चे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे, कारण व्हिटॅमिन डी मुळे आपल्या शरीरातील हाडांना कॅल्शियम मिळतं. जेणेकरून आपली हाडं ही ठिसूळ राहतात. कोणत्याही उपचाराची गरज नाही; दुःख, निराशेतून बाहेर पडण्याचे सोपे मार्ग दैनिक जागरणमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार शरीरात जर व्हिटॅमिन डी चे योग्य प्रमाण असेल तर तुम्ही कोरोनासारख्या गंभीर आजाराला मात देऊ शकता. त्यामुळे आता कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपल्या आहारात व्हिटॅमिन डी चा समावेश असेल तर कोरोनाला आळा घालणे आणखी सोपे होणार आहे. या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार शरीरात व्हिटॅमिन डी मुळे केवळ कोरोनाच नाही तर आपल्याला मृत्यू होण्याचा धोकाही कमी होणार आहे. हा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आला आहे. हे संशोधन आयर्लंडमधील ट्रिनिटी कॉलेज (Trinity College), स्कॉटलंडमधील एडिनबरा विद्यापीठ (Edinburgh University) आणि चीनच्या झेजियांग विद्यापीठाच्या (zhejiang university) माध्यमातून करण्यात आले होते. यामध्ये Vitamin D च्या आहारातील समावेशावर आणि कोरोना रूग्णांमधील त्यासंदर्भातील बदलांवर संशोधन करण्यात आले होते. सामान्य रुग्ण बनून गेलेल्या आरोग्य मंत्र्यांना गार्डनं दिला दंडुका, काय घडलं? झेजियांग विद्यापीठातील संशोधक जू ली यांच्या मते, आमच्या संशोधनात व्हिटॅमिन डी मुळे केवळ हाडांचाच विकार थांबत नाही तर त्यामुळे कोरोनावरही याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. ज्यामुळे कोरोनाविरूद्ध लढताना याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्याचबरोबर या संशोधनात काम करणाऱ्या ट्रिनिटी कॉलेजच्या प्राध्यापिका लीना जगागा यांनी याविषयी बोलताना म्हटलं आहे की आम्ही केलेल्या संशोधनात कोरोनाच्या निवारणासाठी व्हिटॅमिन डी च्या सप्लीमेंटला सुरक्षित असल्याचं आम्हाला जाणवलं आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी Vitamin D आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Coronavirus, Health Tips, Vitamin D

    पुढील बातम्या