नवी दिल्ली, 19 सप्टेंबर: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी एक वेगळाच अनुभव घेतला आहे. सामान्य व्यक्ती बनून रुग्णालयात गेल्यानंतर जे काही घडलं ते एकदम विचित्र होतं. स्वतः मनसुख मांडविया यांनी याबाबतचा अनुभव सांगितला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हे अलीकडेच दिल्लीतल्या ( Safdarjung Hospital) सफदरजंग रुग्णालयात अचानक सामान्य रुग्ण बनून तपासणीसाठी पोहोचले. तेव्हा एका सुरक्षारक्षकानं त्यांना बेंचवर बसताना काठीनं मारलं, असं मनसुख मांडविया यांनी सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, याच दरम्यान रुग्णालयातील अव्यवस्थाही बघायला मिळाली.
Visited GMC Baramulla, J&K, and inaugurated a 50-bedded portable health care unit to enhance medical facilities in remote areas.
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 18, 2021
Also, at the venue, inaugurated an exhibition on New Medical Colleges. pic.twitter.com/EfVgFQaHOG
मांडविया यांनी गुरुवारी एकाच रुग्णालयात चार आरोग्यविषयक सुविधा सुरू केले. या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमा दरम्यान मांडविया यांनी ही गोष्ट उपस्थित डॉक्टरांसोबत शेअर केली. यावेळी त्यांनी यंत्रणा सुधारून देशाचं मॉडेल रुग्णालय बनवण्याच्या सूचना दिल्या. सुरक्षारक्षकानं का मारला दांडका मांडविया यांनी सफदरजंग रुग्णालयामध्ये नवीन ऑक्सिजन प्लांट, कोरोनाच्या उपचारासाठी तात्पुरतं रुग्णालयासह चार सुविधांचं उद्घाटन केलं. यानंतर, डॉक्टरांना संबोधित करत असताना मांडविया यांनी येथे अचानक निरीक्षणासाठी दिलेल्या भेटीदरम्यान झालेली घटना सांगितली. त्यांनी सांगितलं की, जेव्हा ते एका सामान्य रुग्णाप्रमाणे बेंचवर बसले तेव्हा सुरक्षारक्षकानं त्यांना काठीनं मारलं आणि म्हटलं की इथे बसू नकोस. Deepika Padukone नं विचारलं, घरी कधी येणार?, रणवीर म्हणतो… सुरक्षारक्षकानं वृद्ध महिलेला केली नाही मदत यावेळी मांडविया यांनी पाहिलं की, रुग्णालयामध्ये 75 वर्षांच्या एका वृद्ध महिलेला तिच्या मुलासाठी स्ट्रेचरची गरज आहे. तेव्हा त्यांनी पाहिलं की, सुरक्षा रक्षकांनी त्या वृद्ध महिलेला स्ट्रेचर मिळवण्यात कोणतीही मदत केली नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की, रूग्णांना कोणत्याही समस्येला सामोरे जावं लागू नये अशाप्रकारे रुग्णालयात व्यवस्था करावी. IPL 2021: मुंबईच्या मॅचपूर्वी धोनीनं दाखवलं ट्रेलर, VIDEO पाहून वाढलं रोहितचं टेन्शन जर हॉस्पिटलमध्ये 1500 गार्ड असतील तर ते वृद्ध स्त्रीला स्ट्रेचर नेण्यात का मदत करू शकत नाहीत. त्यामुळे आपत्कालीन ब्लॉकमध्ये पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात केले पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. पंतप्रधानांनी विचारलं सुरक्षारक्षकाला निलंबित केलं?, त्यावर मांडविया बोलले… मनसुख मांडविया यांनी डॉक्टरांना सांगितलं की, या रुग्णालय भेटीचा अनुभव मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शेअर केला. जेव्हा मी ही संपूर्ण गोष्ट पंतप्रधानांना सांगितली तेव्हा त्यांनी विचारलं की, काठी मारणाऱ्या सुरक्षा रक्षकाला निलंबित केलं का? यावर आरोग्य मंत्री म्हणाले की नाही, कारण त्यांना व्यवस्था सुधारण्याची इच्छा आहे. हॉस्पिटल आणि डॉक्टर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू सांगून मांडविया यांनी कोरोनाच्या उपचारात डॉक्टरांनी केलेल्या कामाचे कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की सर्व डॉक्टरांनी टीम वर्क म्हणून काम केलं पाहिजे. त्यांनी आशा व्यक्त केली की, हे रुग्णालय आपली प्रतिमा बदलण्यासाठी प्रेरणा म्हणून काम करेल. राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर अंबिका सोनींनी दिली प्रतिक्रिया, Watch Video ऑगस्ट महिन्यात घडली घटना गेल्या महिन्यात म्हणजेच 24 ऑगस्टच्या रात्री ते सामान्य रुग्ण म्हणून सफदरजंग रुग्णालयाच्या इमर्जन्सी ब्लॉकमध्ये पोहोचले होते. यानंतर त्यांनी CGHS च्या एका डिस्पेंसरीची अचानक तपासणी केली. त्यांनी गुरुवारी रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधला आणि सुविधांबद्दल विचारणा केली. तत्पूर्वी बुधवारीही त्यांनी RML रुग्णालयामध्ये अचानक तपासणी केली.