जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आता आलं 'हंटर मशीन'; यापुढे कोणताच व्हायरस कोरोनासारखा थैमान घालणार नाही

आता आलं 'हंटर मशीन'; यापुढे कोणताच व्हायरस कोरोनासारखा थैमान घालणार नाही

आता आलं 'हंटर मशीन'; यापुढे कोणताच व्हायरस कोरोनासारखा थैमान घालणार नाही

प्राण्यांमधील व्हायरसचा माणसांमध्ये संसर्ग होण्यापूर्वीच त्याची माहिती मिळणार.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    एडिनबर्ग, 02 ऑक्टोबर : गेल्या दीड वर्षापासून सगळं जग कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामुळे उद्भवलेल्या महाभयंकर साथीचा (Corona pandemic) सामना करत आहे. जगभरातल्या कोट्यवधी नागरिकांना या विषाणूमुळे कोविड-19ची लागण झाली, लाखो जणांचा जीव गेला आहे. आता यावर लस (Corona vaccine) उपलब्ध झाल्याने हा संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत होत आहे; पण धोका पूर्णपणे टळलेला नाही. या दीड वर्षाच्या काळात निर्माण झालेली भीषण परिस्थिती न भूतो न भविष्यति अशीच आहे. जगभरातले अनेक देश या कोरोना विषाणूमुळे झालेल्या विनाशातून अद्याप बाहेर येऊ शकलेले नाहीत. पुन्हा अशी स्थिती निर्माण झाली तर काय होईल, या शंकेनं लोक भयकंपित होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत दिलासादायक बातमी शास्त्रज्ञांनी दिली आहे. संशोधकांनी एक मशीन तयार केलं आहे, ज्यामुळे कोणताच व्हायरस कोरोनासारखा थैमान घालू शकणार नाही (Virus from animal to human). कोरोनाचा विषाणू वटवाघळांपासून माणसांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जातं आहे. याबाबत अद्यापही शोध सुरू आहे. कोरोनासारखे असेच बरेच व्हायरस आहेत, जे प्राण्यांमधून माणसांमध्ये येतात आणि मग ते मोठ्या प्रमाणात पसरतात आणि महासाथीचं रूप घेतात. पण आता प्राण्यांमधून माणसांमध्ये व्हायरस पसरण्याआधीच त्याची माहिती मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून, कोरोनासारखा विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरण्यापूर्वीच शोधला जाऊ शकतो आणि साथीत रूपांतर होण्यापूर्वीच तो रोखता येऊ शकतो, असं एका संशोधनात सिद्ध झालं आहे. हे वाचा -  या ड्रिंक्समुळे पॉझिटिव्ह येऊ शकतो कोरोना रिपोर्ट; समोर आली धक्कादायक बाब स्कॉटलंडमधल्या (Scotland) ग्लासगो विद्यापीठातले (University of Glasgow) नारदस मोलेन्त्झे (Nardus Mollentze), सायमन बाबयान (Simon Babayan) आणि डॅनियल स्ट्रीकर (Daniel Streicker) या तीन संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असा दावा केला आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून कोरोनासारखा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरण्यापूर्वी शोधला जाऊ शकतो आणि साथीत रूपांतर होण्यापूर्वीच त्याला रोखता येऊ शकतं. कोरोनाप्रमाणेच प्राण्यांमधून मानवांमध्ये पसरणाऱ्या विषाणूमुळे (Spread of Virus) अनेक नवीन रोग होत आहेत. योग्य जेनेटिक मटेरियल (Genetic Material) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज उपकरणांच्या मदतीनं विषाणूचा संसर्ग पसरण्यापूर्वीच त्याचा शोध घेतला जाऊ शकतो आणि त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं असा दावा संशोधकांनी केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विषाणूची चाचणी घेण्याची शक्यता शोधण्याबाबत पूर्वी लिव्हरपूल विद्यापीठात एक संशोधन करण्यात आलं होतं त्याचाही ग्लासगोच्या शास्त्रज्ञांना फायदा झाला. तसंच पीएलओएस (PLOS) बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे, की प्राण्यांमधल्या सुमारे 16 लाख विषाणूंपैकी फक्त काहीच संसर्गजन्य आहेत, जे प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, विषाणूंच्या जेनेटिक सिक्वेन्सची (Genetic Sequence) तपासणी करून या विषाणूचा जनावरांमधून माणसांमध्ये फैलाव होऊ शकतो की नाही हे जाणून घेता येते. 2019 साली चीनमधल्या (China) वुहान येथे (Wuhan) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असता, तर कदाचित तेव्हाच कोरोनाचा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतो किंवा नाही, हे कळलं असतं. हे वाचा -  जीवघेण्या कोरोनामुळेच जीवदान; कोविडने महिलेला मरणातून वाचवलं या नवीन संशोधनामुळे सगळ्या जगाला दिलासा मिळाला असून भविष्यात अशा भयंकर संकटातून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात