डायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक्स! फायदे माहिती झाले तर,रोज प्याल

कारल्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत.

रक्तातली साखर (Blood Sugar) नियंत्रात ठेवायची असेल तर,डायबेटिज रुग्णांसाठी हे हेल्दी ड्रिंक (Healthy Drink) फायदेशीर आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 जून: डायबेटिज (Diabetes) हा असा आजार आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम (Body Effect) होतं. या एका आजाराने अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. डायबेटीजच्या रुग्णाना औषधांबरोबर (Medicine) बरीच पथ्यही पाळावी लागतात. या रूग्णांना त्यांच्या आहाराची (Diet) खूप काळजी घ्यावी लागते. आजच्या काळात मधुमेह एक गंभीर समस्या (Problem) बनली आहे. मधुमेह कधीच पूर्णपणे बरा करणं शक्य नाही पण, नियंत्रणात (Control) ठेवला जाऊ शकतो. या आजारात शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागेल. त्यासाठी योग्य आहार घ्यावा लागतो. आहाराकडे दुर्लक्ष केल्याने बरंच नुकसान होऊ शकतं. डॉक्टरांच्यामते डायबेटिज अनुवंशिकता,वाढत्या वयामुळे किंवा लठ्ठपणामुळे आणि जास्त तणावामुळे होऊ शकतो. (अगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक) डायबेटिजच्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकर होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे किडनी आणि युरिनची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डायबेटिज रुग्णांनी फळं,हिरव्या भाज्या आणि तांदूळ यांचा आपल्या आहारात समावेश करावा. तर,काही खास ड्रिंकही डायबेटिजमध्ये फायदेशीर ठरू शकतात. ग्रीन टी ग्रीन टी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुप फायदेशीर आहे. यात कर्बोहायड्रेट आणि कॅलरीज खुप कमी असतात. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टीऑक्सिडन्ट असतात. ज्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो. ग्रीन टी टाईप 2 डायबेटीजमध्ये आणि हृदयासाठी खुप फायदेशीर आहे. याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. (तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच) कारल्याच रस काल्याचा रस मधुमेहासाठी खुप फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात रहाते. कारल्या रस ग्लूकोजचं प्रमाण नियंत्रणात ठेवतं आणि पोटाच्या अनेक आजारातही फायदा होतो. नारळ पाणी व्हिटॅमीन,खनिज आणि अमीनो ऍसिड सारखे पौष्टिक घटक नारळ पाण्यात मुबलक प्रमाणात असतात. पोटॅशियम,कॅल्शिय,मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी,सोडियम आणि मॅंगनीज सारखे घटक नारळात आढळतात. नारळ पाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि मधुमेहासाठी हे एक हेल्दी ड्रिंक आहे. (औषधांना कंटाळलात? डायबेटिससाठी ‘हे’ घरगुती उपायही करून पहा) काकडीचा रस काकडीमध्ये कॅल्शियम,आयर्न,फॉस्फरस,व्हिटॅमिन ए,बी 1,व्हिटॅमिन सी आणि अमीनो ऍसिड असतात. काकडीचा रस शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो. त्याबरोबर उष्णता,संसर्ग,जळजळ आणि संधिवा कमी करण्यासाठी देखील काकडी फायदेशीर आहे. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीर थंड राहतं. काकडीचा रस मधुमेहासाठी एक चांगलं पेय आहे. कॅमोमाल चहा कॅमोमाईल चहामध्ये कमी कॅलरीज आणि ऍन्टीऑक्सिडन्ट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेहासाठी खुप फायदेशीर आहे. कॅमोमाईल चहा टाइप 2 डायबेटीजमध्ये ग्लायसेमिक नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. नियमित घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय हे किडनी आणि डोळे निरोगी राहतात.
    Published by:News18 Desk
    First published: