• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • पालकांनो, अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; आयुष्यात नक्की होतील यशस्वी

पालकांनो, अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; आयुष्यात नक्की होतील यशस्वी

या गोष्टी अंमलात आणल्यामुळे मुलं नक्कीच यशस्वी होऊ शकतात.

  • Share this:
    मुंबई, 22 जून: कोरोनामुळे (Corona virus) सध्याच्या काळात शाळा आणि कॉलेज (schools and colleges) बंद आहेत. सरकारकडूनही अजून शाळा उघडण्याबाबत  (School opening date) संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुलांचं शिक्षण सध्या ऑनलाईन (Online education) पद्धतीनं सुरु आहे. मात्र शिक्षणात मुलांना असंख्य अडचणी येत आहेत. त्यात काही पालक घरूनच काम (Work from Home jobs) करत असल्यामुळे मुलांना पालकांचा पूर्णवेळ सहवास लाभत आहे. याच वेळेचा फायदा घेऊन पालक मुलांना काही नवीन गोष्टी शिकवत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आयुष्यातील काही काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता आणि त्यांचं महत्त्वं पटवून देऊ शकता. या गोष्टी अंमलात आणल्यामुळे मुलं नक्कीच यशस्वी होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया. वेळेचं व्यवस्थापन अगदी लहान वयातच मुलांना वेळेचं व्यवस्थापन (Time Management) शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे त्यांना वेळेचं महत्त्वं समजेल आणि ते यशस्वी होतील. यासाठी मुलांना वेळेचं बंधन पाळण्यास शिकवा.सकाळी शाळेत जाण्यास सांगा आणि दिवसभर केलेल्या कामांची यादी तयार करायला सांगा. तसंच रात्रीच्या वेळी अलार्म (Alarm) लावण्याची आणि सकाळी योग्य वेळी स्वतःहून उठण्याची सवय लावा. मुलांना अभ्यास करण्याच्या आणि गेम्स खेळण्याच्या वेळा ठरवून द्या. असं केल्यामुळे त्यांना वेळेचं महत्त्वं कळेल आणि ते भविष्यात यशस्वी होतील. हे वाचा -कोणावरही विश्वास ठेवताना या 3 गोष्टींचा विचार करा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ पैशांचं महत्वं आपल्या मुलांना पैशाचं मूल्य (Importance of Money) देखील समजावून सांगितलं पाहिजे. खिशातील पैसे कसे वापरायचे हे त्यांनानक्कीच समजवून सांगितलं पाहिजे. आपल्यासाठी निरोगी गोष्टी किंवा अत्यावश्यक वस्तू (Essential things) मिळवण्यासाठी पैसे योग्य रीतीनं कसे खर्च करावे हे देखील सांगितलं पाहिजे. तसंच त्यांना एटीएम (ATM) आणि बँक संबंधित प्रत्येक गोष्टीची माहिती देणं आवश्यक आहे ज्यामुळे त्यांना व्यवहार ज्ञान येईल. आपातकालीन स्थितीचं ज्ञान एखाद्या वेळी अचानक घरात काही आपातकालीन स्थिती (Emergency situation) आल्यावर नक्की कोणती पावलं उचलली पाहिजेत याबद्दल आपल्या मुलांना सतर्क करून ठेवणं महत्त्वाचं आहे. घरात अचानक आग लागली किंवा कोणाची प्रकृती बिघडली तर आपातकालीन नंबर्स (Emergency numbers) ही मुलांकडे देऊन ठेवले पाहिजेत. जेणेकरून त्यांना स्थिती हाताळण्यासाठी कोणाची मदत मागता येईल. मुलांना प्रत्येक संकटाचा सामना करण्यास सक्षम बनवलं पाहिजे. स्वयंपाक बनवणं आजकाल अनेक मुलं लहानपणापासूनच घराच्या दूर कुठेतरी परदेशात किंवा दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी जातात. मात्र अनेकदा त्यांना जेवण बनवता येत , नसल्यामुळे जेवणासाठी अडचणी निर्माण होतात. म्हणूनच मुलांना आतापासूनच ब्रेकफास्ट बनवणं, चपाती करणं, भाजी करणं किंवा चहा बनवणं (cooking skills)अशा काही गोष्टी शिकवणं महत्त्वाचं आहे. यामुळे मुलांना जेवणासाठी कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही.
    Published by:Atharva Mahankal
    First published: