Home /News /lifestyle /

Vastu Shastra: श्रीलक्ष्मीचा वरदहस्त लाभावा असं वाटतंय? पर्समध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी

Vastu Shastra: श्रीलक्ष्मीचा वरदहस्त लाभावा असं वाटतंय? पर्समध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी

लक्ष्मीची कृपा कायम आपल्यावर राहावी असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला वास्तुशास्त्र तज्ज्ञांनी दिला आहे

दिल्ली, 25 सप्टेंबर: पैसा (Money) ही जगातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकजण पैसा मिळवण्यासाठी धडपडत असतो. अनेकांना उंची राहणीमान हवं असतं त्यासाठी पैशाची गरज असते. तसंच आयुष्यातील किमान गरजा पूर्ण करण्यासाठीही किमान पैशांची गरज असते. आपल्याकडे भरपूर पैसा असावा, जगातील सगळी सुख आपल्याला, आपल्या कुटुंबाला देता यावीत अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी असंख्य लोक जीव तोडून कष्ट करत असतात. काही वेळा मात्र अनेकांच्या जीव तोड मेहनतीला कसलंच यश येत नसल्याचं दिसतं. अनेकदा आपण काही लोकांना असं म्हणताना ऐकतो की, आमच्या घरात पैसा टिकत नाही. लक्ष्मी (Goddess Laxmi) आमच्यावर नाराज आहे. यामागे आपल्या काही सवयीही कारणीभूत असतात. वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) या गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळं लक्ष्मीची कृपा कायम आपल्यावर राहावी असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला वास्तुशास्त्र तज्ज्ञांनी दिला आहे. आज तक डॉट इननं याबबतचं वृत्त दिलं आहे. वरून गोड-गोड बोलणारी आतून पक्की डँबीस असू शकतात; फसव्या लोकांना असं ओळखा आपण पाहतो की काही महिलांना नेहमी पर्समध्ये औषधं ठेवण्याची (Medicines In Purse) सवय असते. मात्र यामुळे आयुष्यात नकारात्मकता येते त्यामुळे ही सवय टाळणे महत्त्वाचे आहे. तसंच अनेकदा महिला पर्समध्ये चॉकलेट, गोळ्या, खाण्याचे काही पदार्थ किंवा फळे ठेवतात. हे देखील चुकीचे आहे. वास्तूशास्त्रानुसार पर्समध्ये अन्नपदार्थ ठेवणं हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे. अनेक लोकांना वस्तू (Things) इथे आणि तिथे फेकण्याची सवय असते. त्यांनी ही सवय बदलली तर त्यांना लाभ होऊ शकतो. घर (Home) असो की कार्यालय (Office) नेहमी व्यवस्थित, नीटनेटकं ठेवणं आवश्यक आहे. नीटनेटकी, प्रसन्न वास्तू असेल तर तिथं सकारात्मक ऊर्जा वाढत असते. अजब! महिला घेऊ शकतात चक्क भीतीचा वास, संशोधनातील निष्कर्ष त्यामुळं घरात किंवा कार्यालयात, क्रिस्टल ट्री (Crystal Tree), बांबूचे रोप, लाफिंग बुद्धा (Laughing Buddha), सोन्याच्या नाण्यांसह जहाज अशा वस्तू ठेवल्यास तिथं शांतता टिकून राहते आणि लक्ष्मीचाही वास कायम राहतो. अंधारामुळे आयुष्यात नकारात्मकता येते त्यामुळे घरात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश (Sunlight) येईल याची काळजी घ्या. घरात स्वच्छ मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश असणंही लाभदायी असतं. घर घेताना या गोष्टीची आवर्जून पाहणी करा. घरात स्वच्छता (Cleanliness) असणंही महत्त्वाचं आहेच पण घराचा मुख्य दरवाजा सुंदर आणि स्वच्छ असणं अधिक गरजेचं असतं. कारण घरात येणारी लक्ष्मीदेवी घराच्या मुख्य दरवाजातून आत येते. VIDEO: तुम्ही वापरताय तो गूळ रसायनयुक्त आहे की निर्भेळ? गुळातला फरक कसा ओळखायचा त्यामुळे घराचा मुख्य दरवाजाही नेहमी स्वच्छ ठेवा. घरातील नळ गळण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींचाही परिणाम होत असतो. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे अशा किरकोळ गोष्टींकडेही ताबडतोब लक्ष देऊन दुरुस्ती करून घेणं महत्त्वाचं असतं. या गोष्टी खूप किरकोळ, क्षुल्लक वाटतील पण त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींकडे लक्ष देऊन पहा तुम्हालाही पैसा टिकत नसल्याची अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होऊ शकेल. तेव्हा या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या.
First published:

Tags: Home-decor

पुढील बातम्या