नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : या जगात हजारो प्रकारच्या स्वभावाचे लोक आहेत. त्या सगळ्यांचा स्वभाव प्रकार (Identify To Fake Gestures) ओळखणे कठीण आहे. काही खूप प्रामाणिक असतात, काही खूप बेईमान आहेत. तर काही खूप हुशार असतात, तर काही खूप चालाक असतात. सर्वसाधारणपणे, वरील दिसण्यावरून एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे हे समजून घेणे फार अवघड बाब आहे. टीओआयच्या बातमीनुसार, काही लोक त्यांच्या वरच्या हावभावांनी आणि बोलण्याद्वारे स्वत: ला अतिशय सुंदर आणि सभ्य असल्याचे भासवतात. असे लोक सर्व-सामान्य लोकांमध्ये देखील लोकप्रिय होतात, परंतु अशा लोकांपैकी काही लोकांचे आंतरीक हेतू अत्यंत कुटिल असतात. हे लोक वरून चांगले वागून एकदम साधे-सरळ दाखवण्याच प्रयत्न करतात, परंतु त्यांचे हावभाव खोटे (Fake Gestures) असतात आणि ते त्यांच्या हुशारीने त्यांचा घाणेरडा उद्देश पूर्ण करू शकतात. आपल्या काही कळेपर्यंत अनेकदा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच अशा लोकांना ओळखणे महत्वाचे आहे. बनावट हावभाव कसे ओळखावे आय (eye) कॉन्टेक्ट : ही फसव्या लोकांची सर्वात सोपी युक्ती आहे. संपर्कात आल्यानंतर हळूहळू तुमच्याशी आय कॉन्टेक्ट साधतील आणि बराच वेळ तुमच्याकडे टक लावून पाहतील. तुम्ही त्यांना स्पेस देत आहात हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला ते फसवण्याचा प्रयत्न करू लागतात. तोपर्यंत तुम्हाला कळणारही नाही. असे लोक आधी तुमची परीक्षा घेतात. जर तुम्हाला आक्षेप नसेल, तर हे लोक स्वतःला त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण समजतात आणि तुमच्यामध्ये खूप रस घेऊन भरपूर काही बोलू लागतात. अशा लोकांना अगदी सुरुवातीला ओळखणे महत्वाचे आहे. लक्ष वेधून घेणे : काही लोकांना आपले लक्ष त्यांच्याकडे जावे असे वाटते. यासाठी हरतऱ्हेचे मार्ग अवलंबले जातात. यासाठी, कधीकधी तो त्याच्या शक्तीचा वापर करेल, आणि कधीकधी तो तुमचा परोपकारी बनण्याचा प्रयत्न करेल. तो धमकावण्याचा प्रयत्नही करू शकतो. अशाप्रकारे, तो तुम्हाला कोणत्याही किंमतीवर व्यवहार करण्यासाठी किंवा संबंध ठेवण्याचा प्रयत्न करेल. गोपनीय माहिती सांगणे : कधीकधी असे लोक तुम्हाला आकर्षक वाटतील. ते तुम्हाला नेहमी जिंकू इच्छितात. तो तुम्हाला खास वाटण्यासाठी कधीकधी गोपनीय माहिती सांगेल, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही त्याच्यासाठी खास आहात, म्हणून ही माहिती शेअर करत आहे. असे लोक कधीकधी असे काही करतील की तुम्हालाही त्यांची उणीव भासू लागेल, पण प्रत्यक्षात ही अशा लोकांची फसवणूक करण्याची कला आहे. हे वाचा - औरंगाबादेत ऑनरकिलिंग? घरातील वादानंतर विहिरीत आढळला मुलीचा देह, वडिलांनीच मृत ठरवून लेकीला परस्पर पुरलं तुम्हाला प्रेमळ नावाने हाक मारणे : असे लोक तुम्हाला प्रेमळ नावाने हाक मारतात, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही त्यांच्यासाठी खास आहात. त्याला आपले काम चांगले कसे करावे हे माहीत आहे. तर, तो कसा तरी तुमच्या घराचे नाव शोधून तुम्हाला त्या नावाने हाक मारेल. ही एक रणनीती आहे. त्यामुळे अशी फसवणूक टाळा. हे वाचा - Pegasus Scandal: पेगासस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SC करणार तज्ज्ञ समितीची स्थापना, पुढच्या आठवड्यात जारी करणार आदेश कौतुक करणे : असे लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या उपयोगी येण्याच्या प्रयत्नात असतात. बऱ्याचदा असे लोक तुमचे अगदी छोट्या कामासाठीही कौतुक करतात. उगीच तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







