मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्ही वापरताय तो गूळ रसायनयुक्त आहे की निर्भेळ? गुळातला फरक कसा ओळखायचा, पाहा VIDEO

तुम्ही वापरताय तो गूळ रसायनयुक्त आहे की निर्भेळ? गुळातला फरक कसा ओळखायचा, पाहा VIDEO

रसायनमुक्त गूळ चांगला हे आपल्याला माहीत आहे पण बाजारात मिळणारा गूळ बघून तो रसायनयुक्त आहे की शुद्ध हे कसं ओळखायचं? रंगावरून कळेल रसायनाचं प्रमाण

रसायनमुक्त गूळ चांगला हे आपल्याला माहीत आहे पण बाजारात मिळणारा गूळ बघून तो रसायनयुक्त आहे की शुद्ध हे कसं ओळखायचं? रंगावरून कळेल रसायनाचं प्रमाण

रसायनमुक्त गूळ चांगला हे आपल्याला माहीत आहे पण बाजारात मिळणारा गूळ बघून तो रसायनयुक्त आहे की शुद्ध हे कसं ओळखायचं? रंगावरून कळेल रसायनाचं प्रमाण

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : गूळ (Jaggery) हा आपल्या आहारातल्या (Diet) प्रमुख पदार्थांपैकी एक. गूळ आरोग्यासाठी हितावह असतो. त्यातले औषधी गुणधर्म विविध आजारांवर परिणामकारक ठरतात. काही लोक आरोग्यासाठी साखरेऐवजी (Sugar) गुळाचा पर्याय म्हणून वापर करतात. आज बाजारात गुळाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. यात रसायनमुक्त गूळ (Chemical free Jaggery) ओळखणं तसं अवघडच असतं. रसायनयुक्त गुळाच्या (How to identify pure jaggery) सेवनानं आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रसायनमुक्त गुळाचं सेवन अधिक श्रेयस्कर आहे. रसायनयुक्त गूळ कसा ओळखावा, याविषयीची माहिती देणारा एक व्हिडिओ (Video) प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी नुकताच शेअर केला आहे. त्याबाबतचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे.

आरोग्यासाठी हितावह असणाऱ्या अनेक पदार्थांपैकी गूळ हा महत्त्वाचा पदार्थ आहे. अनेक जणांना मधुमेहाची (Diabetes) व्याधी असते. साखरेचं सेवन अशा व्यक्तींना वर्ज्य असतं; पण मधुमेही रुग्णांना साखरेऐवजी गुळाचं सेवन चालू शकतं, असं काही जण मानतात. अन्य आजारांतही गूळ फायदेशीर ठरतो. गुळाचं सेवन करण्यापूर्वी तो रसायनयुक्त आहे की रसायनमुक्त हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण भेसळयुक्त गुळामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी असली आणि नकली गुळातला फरक कसा ओळखावा, याबाबत मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. या व्हिडिओत पंकज भदौरिया यांनी गूळ ओळखण्यासाठी सोपी पद्धत सांगितली आहे.

गूळ खाल्ल्याने अन्न पचन (Digestion) सहज होतं आणि शरीरात ऊर्जा कायम राहते. गुळातलं कॅल्शियम (Calcium) हाडं मजबूत ठेवण्यासाठी पूरक ठरतं. गुळातली पोषक तत्त्वं हृदयविकार (Heart Disease) दूर ठेवण्यासाठी मदत करतात. गुळाच्या सेवनानं मासिक पाळी वेळेवर येते. गॅसेसचा त्रास गुळाच्या सेवनानं दूर होतो. शरीरातली लोहाची (Iron) कमतरता दूर होण्यासाठी गूळ फायदेशीर ठरतो. वजन कमी करण्यासाठी साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर योग्य ठरतो. रोज गूळ खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत राहतो, असं तज्ज्ञ सांगतात.

रोज एक केळ खाणं आहे खूपच उपयुक्त; महिलांना होऊ शकतात हे लाभ

पंकज भदौरिया यांनी योग्य गूळ कसा ओळखावा, याबाबत व्हिडिओत मार्गदर्शन केलं आहे. त्यानुसार शुद्ध किंवा रसायनमुक्त गुळाचा रंग डार्क ब्राउन (Dark Brown) असतो.

गुळाचा रंग फिकट पांढरा किंवा पिवळा असल्यास तो रसायनयुक्त आहे, असं समजावं.

Yoga for hair: दररोज पाच मिनिटे 'हा' योग केल्याने थांबू शकतं केस गळणं

पांढऱ्या किंवा लाइट ब्राउन रंगाच्या गुळात रसायनं किंवा कृत्रिम रंगाचा (Artificial Color) वापर केलेला असू शकतो. गुळात कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जाऊ शकतो. गुळाचं वजन वाढवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर केला जातो, तर गूळ चमकदार दिसावा यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर होतो, असं शेफ पंकज भदौरिया यांनी व्हिडिओतून स्पष्ट केलं आहे.

गुळाचं सेवन करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासण्यासाठी या सोप्या पद्धतीचा वापर केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.

First published:

Tags: Food, Processed food