नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: अनेकदा आपलं मन अस्वस्थ होतं, आपलं कशात लक्ष लागत नाही, काय नेमकं होतंय ते कळत नसतं पण काहीतरी हुरहूर लागलेली असते. काही वेळाने एखादी अशुभ बातमी येते किंवा काहीतरी वाईट घटना घडते. त्यावेळी आपल्या लक्षात येतं की आपल्या मनाची अस्वस्थता या कारणामुळे होती. याचप्रमाणे भीतीची (Fear) चाहूलही वासावरून (Smell) ओळखता येते असा निष्कर्ष एका शास्त्रीय संशोधनातून पुढे आला आहे. मात्र ही क्षमता फक्त महिलांमध्येच (Females) असल्याचे सिद्ध झालं आहे. झी न्यूज डॉट इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, हेन्रिक हेन युनिव्हर्सिटीच्या (Henric Hen University) संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात हा निष्कर्ष समोर आला आहे. प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची तरी भीती वाटते. कोणाला उंचीची, कोणाला अंधाराची, कोणाला रक्ताची, अशी विविध प्रकारची भीती प्रत्येकाला वाटत असते. भीती (Fear) ही एक मानवी भावना आहे. त्याबाबत केलेल्या नव्या संशोधनानुसार, महिला एखाद्या व्यक्तीच्या वासावरून भीतीची जाणीव ओळखू शकतात असं सिद्ध झालं आहे.
हे काय आहे? दिराने पाठवली अशी लग्नपत्रिका; मजकूर वाचून वहिनीच्या रागाचा चढला पारा
वैज्ञानिकांनी यासाठी एक प्रयोग केला. त्यात केलेल्या निरीक्षणानुसार भीती वाटत असलेल्या लोकांच्या घामाचा वास (Smell of Sweat) घेतल्यानंतर महिलांच्या वर्तनात (Female’s Behaviour) आश्चर्यकारक बदल झाल्याचे दिसून आले. या संशोधनात 214 पुरुष आणि महिलांचा समावेश होता. यात प्रत्येकाला मास्कच्या साहाय्याने घामाच्या विविध नमुन्यांचा वास घ्यावा लागला. यासाठी एका सभागृहात भाषण ऐकणाऱ्या लोकांसह क्रीडांगणावर खेळ बघण्यास उपस्थित असलेल्या लोकांच्या घामाचे नमुने गोळा करण्यात आले होते. तसंच या प्रक्रियेदरम्यान वास घेणाऱ्या महिलांना पाच खेळ खेळण्यास सांगण्यात आलं होतं.
मानसिक तणावामुळे कमी होतोय चेहऱ्यावरचा ‘Glow’? घ्या अशी काळजी
या वेळी संशोधकांना अत्यंत अजब निष्कर्ष दिसून आले. काही महिलांच्या वर्तनात बदल झालेला आढळला. एरव्ही त्या जशा वागतात त्यापेक्षा वेगळ्या वागत असल्याचं दिसून आलं. खेळ खेळताना त्या अधिक आक्रमक झालेल्या आढळल्या, तसेच इतरांवर विश्वास न ठेवण्याची त्यांची भूमिका दिसून आली. या महिलांनी ज्या घामाच्या नमुन्यांचा वास घेतला होता, ते लोक भीतीग्रस्त, चिंताग्रस्त असल्याचे आढळून आले. यावरून महिलांना घामाच्या वासावरून भीती, चिंता यांची जाणीव ओळखता येत असल्याचं स्पष्ट झालं. अनेकदा महिलांना एक सहावी संवेदनक्षमता असल्याचं म्हटलं जातं. महिलांमधील अशा सुप्त क्षमतांची शास्त्रीय सिद्धता यामुळे झाली आहे.
वजन नियंत्रणासह ताकाचे इतके सारे आहेत फायदे; लस्सीही तुमच्यासाठी आहे उपयोगी
संशोधनातील या निष्कर्षामुळे मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या किंवा भीती, चिंता यांचा प्रभाव असलेल्या लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

)







