Home /News /lifestyle /

Vastu Stairs: वास्तुशास्त्रात जिन्याला आहे खूप महत्त्व; अशा वस्तू त्याखाली चुकून पण नका ठेवू

Vastu Stairs: वास्तुशास्त्रात जिन्याला आहे खूप महत्त्व; अशा वस्तू त्याखाली चुकून पण नका ठेवू

घराचा जिना किंवा पायऱ्यांबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम आहेत. याबद्दल इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार.कृष्णकांत शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 15 जून : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. घराची वास्तू बरोबर असेल तर घरात सुख-समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. याशिवाय घरामध्ये पसरलेली नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित होऊन घरातील लोकांना फायदा (Vastu Tips for Stairs) होतो. वास्तूनुसार घरातील प्रत्येक वस्तू ठेवल्यास जीवनात अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. अलिकडे प्रत्येक व्यक्ती वास्तुशास्त्रानुसार घर बांधून घेतो. वास्तूच्या नियमांचे पालन करून कोणत्या दिशेला काय ठेवणे योग्य आहे, या गोष्टींवर विशेष लक्ष दिले जाते. घराचा जिना किंवा पायऱ्यांबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम आहेत. याबद्दल इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार.कृष्णकांत शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया. घराच्या पायऱ्या कोणत्या दिशेला असाव्यात - वास्तुशास्त्रानुसार घराच्या पायऱ्या नैऋत्य दिशेला असणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य टिकून राहते. घराच्या मध्यवर्ती भागाला ब्रह्मदेवाचे स्थान मानले जाते, त्यामुळे मध्यभागी पायऱ्या नसल्या पाहिजेत. घराची उत्तर-पूर्व दिशा देखील पायऱ्यांसाठी योग्य मानली जात नाही. याशिवाय घराच्या ईशान्य दिशेला जिने बनवणे टाळावे. ईशान्य कोपर्‍यात जिना बनवल्यास घरात समस्या वाढू लागतात. जिन्याखाली काय ठेवावे आणि काय नाही - जिन्या खाली जागा राहत असल्यामुळे आपण अनेक वस्तू तिथे ठेवतो, पण असे करू नये. जिन्याखाली अग्निशी संबंधित कोणतीही वस्तू ठेवू नका. स्वयंपाकघर आणि देव्हारा देखील जिन्याखाली बांधू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. जिन्याखाली शूज आणि चप्पल ठेवणेही टाळावे. त्यामुळे मुलांच्या तब्येतीत बरेच चढ-उतार होत राहतात. याशिवाय घरमालकाच्या आयुष्यातही अनेक समस्या येतात. जिन्या खाली कुंड्यांमध्ये रोपे लावू शकता. हे वाचा -  जेवणाची भांडी, ताट-वाटीचाही आरोग्यावर होतो परिणाम; या गोष्टींकडे दुर्लक्ष नको जिना कसा असावा - पायऱ्या आपल्या सर्वांना पुढे जाण्याचा संदेश देतात. त्यामुळे घरातील जिन्याच्या पायऱ्या रुंद असाव्यात आणि त्यावर पुरेसा प्रकाश असावा. जिन्याच्या दोन्ही बाजूंना दरवाजे असावेत. हे वाचा - Superfood For Women : वेगवेगळ्या वयोगटानुसार महिलांचा आहार कसा असावा? पायऱ्यांची संख्या विषम ठेवा- घरातील पायऱ्या नेहमी विषम अंकात 7, 9, 11, 15, 17, 19 आणि 21 असाव्यात. जर घरात 17 पायऱ्या असतील तर ते खूप शुभ मानले जाते. विषम पायऱ्या घरात आनंद आणतात. यासोबतच घराच्या मालकाचा विकास आणि समृद्धी होण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Vastu

    पुढील बातम्या