मुंबई, 14 जून : फॅशनच्या या युगात मॉड्युलर किचनचा ट्रेंड आहे, लोक स्वयंपाकासाठी विविध प्रकारची भांडी देखील वापरत आहेत. एकीकडे नॉन-स्टिक पॅनचा वापर वाढला आहे, तर खाण्यापिण्यासाठी लोक फायबर, ग्लास, स्टील किंवा बोन चायना भांड्यांमध्ये खाण्याला प्राधान्य देतात. तरी अजूनही बरीच कुटुंबे आहेत जी तांबे, पितळ यांसारख्या भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आणि सर्व्ह करणे पसंत (Utensils Impact On Health) करतात. मेडलाइन प्लस च्या मते, पूर्वीच्या काळात वापरण्यात येणारी भांडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर होती. उदाहरणार्थ, जर आपण लोखंडाच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवले तर शरीरात लोहाची कमतरता भासणार नाही आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही चांगली राहील. जाणून घेऊया कोणती भांडी आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहेत आणि कोणत्या भांड्यात स्वयंपाक करताना काळजी घेतली पाहिजे. आरोग्यासाठी कोणती भांडी फायदेशीर - तांब्याचा वापर - तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तांब्याच्या ग्लासात किंवा भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्यास पचनक्रिया चांगली होते आणि जखमा लवकर भरून येण्यासही मदत होते. एवढेच नाही तर तांब्याची भांडी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहेत. पण, आंबट वस्तू तांब्याच्या भांड्यात बनवू नये किंवा ठेवू नयेत. मेडलाइनप्लसच्या मते, आपण स्वयंपाक करताना तांबे देखील वापरू शकता. पण त्याचा अतिवापर केल्यास जुलाब, मळमळ किंवा चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकतात. त्यावर दुसर्या धातूचा लेप लावून स्वयंपाकासाठी वापरल्यास ते चांगले होईल. स्टील वापरणे - स्टील हे स्वयंपाकासाठी तसेच खाण्यासाठी सर्वात योग्य धातू मानले जाते. उच्च उष्णतेवरही त्यातून अन्नावर कोणतीही रिअॅक्शन होत नाही. नॉन-रिएक्टिव गुणधर्मांमुळे आपण त्यात काहीही खाऊ आणि पिऊ शकता. त्याशिवाय बिनधास्त कोणत्याही उष्णतेवर काहीही शिजवू शकतो. आरोग्यासाठीही त्याचा वापर फायदेशीर आहे. पितळेचा वापर - आपण पितळेच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवू शकता, परंतु त्यावर स्टीलचा लेप लावल्यावरच स्वयंपाक करताना वापरणे चांगले. वास्तविक, हा धातू गरम झाल्यावर मीठ आणि आम्लयुक्त पदार्थांवर रिअॅक्शन देऊ शकतो, म्हणून त्यात स्वयंपाक करणे टाळले पाहिजे. पण तुम्ही त्याचा ग्लास आणि प्लेट नक्कीच वापरू शकता. पितळेच्या भांड्यातून खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि यकृत चांगले राहते. लोहाचा वापर - स्वयंपाक करताना आपण लोखंडी कढई, तवा इत्यादींचा वापर केला तर त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन सुधारते आणि लाल रक्तपेशींच्या विकासास मदत होते. मात्र, त्यात रसम, सांबार इत्यादी आंबट पदार्थ कधीही बनवू नका. रिअॅक्शन होऊन अन्नाची चव देखील खराब होऊ शकते. इतकेच नाही तर त्यामुळे भाज्यांचा रंगही गडद होऊ शकतो. हे वाचा - Googleने बॅन केले Login-IDचोरी करणारे Apps,लगेच डिलीट करुन बदलाFacebook Password चांदीचा वापर - चांदीच्या भांड्यातही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल घटक आढळतात, जे शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात, पित्त दोष दूर करतात, चयापचय आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, मूड सुधारतात, कफ आणि गॅसची समस्या दूर करतात. त्यामुळे तुम्ही ते ग्लास, चमचे, प्लेट इत्यादी स्वरूपात वापरू शकता. अॅल्युमिनियमचा वापर - अॅल्युमिनियम खूप मजबूत आहे आणि वेगाने गरम होऊ शकते. त्यामुळे अनेकांना त्यात स्वयंपाक करायला आवडते. मात्र, गरम झाल्यावर अॅल्युमिनियम टोमॅटो आणि व्हिनेगर सारख्या अम्लीय खाद्यपदार्थांवर रिअॅक्शन देते आणि अन्न विषबाधाही होऊ शकते. हे वाचा - घरबसल्या असे बनवा तुमचे मतदान ओळखपत्र, Online च्या सर्व स्टेप जाणून घ्या काचेचा वापर - काचेच्या भांड्यामध्ये कोणतीही रसायने नसतात, त्यांना गंध किंवा चव नसते. त्यामुळे ते सुरक्षित मानले जाते. काचेच्या भांड्यातून आपण कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ शकता. मात्र, काचेचं भांडं तुटले-फुटलेले असू नये. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.