मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Superfood For Women : वेगवेगळ्या वयोगटानुसार महिलांचा आहार कसा असावा?

Superfood For Women : वेगवेगळ्या वयोगटानुसार महिलांचा आहार कसा असावा?

स्त्रीला तिच्या वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळा आहार घेणे गरजेचे असते (Superfoods For Women In Different Age). कारण एका स्त्रीच्या आयुष्यात तारुण्य, मातृत्व आणि मग वृद्धापकाळ असे वेगवेगळे टप्पे येत असतात. या वयोगटांमध्ये स्त्रीच्या शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते.

स्त्रीला तिच्या वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळा आहार घेणे गरजेचे असते (Superfoods For Women In Different Age). कारण एका स्त्रीच्या आयुष्यात तारुण्य, मातृत्व आणि मग वृद्धापकाळ असे वेगवेगळे टप्पे येत असतात. या वयोगटांमध्ये स्त्रीच्या शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते.

स्त्रीला तिच्या वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळा आहार घेणे गरजेचे असते (Superfoods For Women In Different Age). कारण एका स्त्रीच्या आयुष्यात तारुण्य, मातृत्व आणि मग वृद्धापकाळ असे वेगवेगळे टप्पे येत असतात. या वयोगटांमध्ये स्त्रीच्या शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते.

पुढे वाचा ...
  मुंबई, 15 जून : माणसाच्या शरीराच्या गरज त्याच्या वयानुसार बदलत असतात. वयानुसार सर्वांना आपल्या आहाराचे, झोपेचे आणि स्वास्थ्याशी निगडित इतर गोष्टींचे नियोजन करावे लागते. आज आपण वेगवेगळ्या व्यवहातातील स्त्रियांच्या सुयोग्य आहाराबद्दल बोलणार आहोत. स्त्रीला तिच्या वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळा आहार घेणे गरजेचे असते. कारण एका स्त्रीच्या आयुष्यात तारुण्य, मातृत्व आणि मग वृद्धापकाळ असे वेगवेगळे टप्पे येत असतात. या वयोगटांमध्ये स्त्रीच्या शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. स्त्रियांच्या शरीरात वयानुसार अनेक गूढ आणि अनाकलनीय बदल होत असतात. अशावेळी योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते. तारुण्यावस्थेत स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात (Superfoods For Teenage Girls). स्त्रियांची स्नायू आणि हाडे अधिक मजबूत होतात. त्याचबरोबर हार्मोनल चेंजेस, रक्तपेशींचा विकास आणि रोग प्रतिकारशक्तीत वाढ होत असते. या भागांची योग्य वाढ होण्यासाठी मुलींना योग्य पोषक तत्वांची गरज असते. हाडे आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी प्रोटिन्स आणि कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन के, कोलेजन आणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिड गरजेचे असतात. या पौष्टिक घटकांचे सेवन केल्याने किशोरवयीन मुलींमध्ये हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. निरोगी लाल रक्तपेशींच्या विकासासाठी लोह आणि बी जीवनसत्त्वे जसे की B-12 आणि फोलेट आवश्यक असतात. पुरेशा लोहाशिवाय, किशोरवयीन मुली संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या लाल रक्तपेशी तयार करू शकत नाहीत. गडद हिरव्या पालेभाज्या, बीन्स, पालक, भोपळ्याच्या बिया, मसूर, ब्रोकोली आणि बीटरूट यासारखे पदार्थ शरीराच्या लोह आवश्यकतेसाठी आवश्यक असतात.

  Curry Leaves Benefits - वजन कमी करण्यासाठी कधी आणि कशी खावी कढीपत्त्याची पाने ?

  गरोदरपणामध्ये आईचा आहार योग्य असणे खूप गरजेचे असते (Superfoods For Pregnant Women). त्यामुळे स्त्रीचे आणि बाळाचे दोघांचेही आरोग्य सुदृढ राहाते. गरोदर्पांमधे स्त्रीला लोह, कॅल्शियम, प्रोटीन, DHA, फायबर यांसारख्या पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील लोहाची गरज हिरव्या पालेभाज्या, पातळ मांस, नट, टोफू आणि पांढरे बीन्स यांसारखे पदार्थ पूर्ण करू शकतात. तर कॅल्शियमसाठी दूध आणि दुग्धजन्य पदर्थांबरोबरच सोया उत्पादने, ब्रोकोली, कॅन केलेला सॅल्मन मासा, हिरव्या पालेभाज्या हे पदार्थ उपयुक्त असतात. प्रोटीनचे स्रोत म्हणून शाकाहारींसाठी पनीर आणि सोया, तर मांसाहारींसाठी अंडी आणि चिकन हे फायदेशीर ठरतात. गरोदरपणामध्ये DHA हे ओमेगा -3 फॅट बाळाच्या मेंदू, डोळे आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी उपयुक्त असते. सॅल्मन आणि ट्यूना फिश, अंडी, नट्स हे DHA चे स्रोत आहेत. चाळीशी पार केलेल्या म्हणजेच किशोरवयीन आणि तरुण मुलांच्या मातांवर मुलांच्या आणि त्यांच्या स्वतःच्या आरोग्याचीदेखील जबाबदारी असते. दुहेरी कसरत करताना अनेकदा स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात (Superfoods For 40+ Women). स्त्रियांना जास्त प्रमाणात अनेक आजार जडण्याचे हेच वय असते. या वयामध्ये अनेक मुलांबरीबरच स्त्रियांवर प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. मात्र असे असले तरी स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. या वयातदेखील स्त्रियांना प्रोटीनची गरज मोठ्या प्रमाणात असते. सनई आणि हाडांची मजबुती आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी. त्याचबरोबर एखाद्या आजारातून किंवा अपघातातून बरे होण्यासाठीदेखील तुमची हाडे मजबूत असणे गरजेचे असते. यासाठी मांस, बीन्स, दुग्धजन्य पदार्थ, मासे, नट, बिया आणि टोफू हे प्रोटीनने भरपयर असलेलं पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करावेत. प्रोटीनप्रमाणे फायबरदेखील आरोग्यासाठी आवश्यक असते. सामान्यपणे फायबरने उपयुक्त असलेल्या भाज्या आणि फळे तुमची पचन क्रिया सुधारते. मात्र या वयात फायबर केवळ एवढेच काम करत नाही. तर ते तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि वजन नियंत्रणात ठेवते. त्यामुळे या वयात फळे, भाज्या, बीन्स आणि संपूर्ण धान्य यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खावे.

  स्कीन केअरसाठी डाळिंबाची साल आहे जबरदस्त उपाय! असा वापर केल्यास दिसेल परिणाम

  वयस्कर आणि साठी पार केलेल्या स्त्रियांना स्नायू आणि ताकदीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक प्रोटीन घेण्याचा सल्ला दिला जातो (Superfood For 60+ Women). वयानुसार आपली हाडे काही प्रमाणात कॅल्शियम गमावतात, तसेच स्नायूंचे वजनादेखील कमी होते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. म्हणूनच 60 व्हायच्या जवळपास जाणाऱ्या महिलांसाठी कॅल्शियम महत्त्वाचे आहे. दूध, दही आणि चीज यांचे सेवन हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी बळकट हाडांसाठी महत्वाचे आहे. हे अंडी, फॅटी फिश आणि व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड डेअरी उत्पादनांमध्ये देखील आढळू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Superfood

  पुढील बातम्या