नवी दिल्ली, 03 मे : आपल्या समाजात चालीरीतींमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण आपल्या वडिलधाऱ्या-ज्येष्ठ मंडळींकडून ऐकत असतो. या गोष्टी ऐकून अनेकांना काही अर्थ वाटत नाही, पण तरीही शतकानुशतके लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत आले आहेत. अनेक लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात, पण वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) काही गोष्टी खूप महत्त्वाच्याही आहेत. उदाहरणार्थ, गरम तव्यावर पाणी ओतू नये, असे म्हणतात. मान्यतेनुसार आपल्या स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच प्राचीन काळापासून स्वयंपाकघरात काही गोष्टी करणं चुकीचं मानलं (Vastu Tips) जातं. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्या मते, गरम तव्यावर पाणी ओतण्यास आपल्याकडे मनाई आहे. गरम तव्यावर पाणी ओतणं का चुकीचं आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. गरम तव्यावर पाणी का टाकू नये? वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकताना येणाऱ्या आवाजामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय असंही मानलं जातं की, गरम तव्यावर पाणी टाकल्याने घरातील कोणत्याही व्यक्तीच्या लग्नात मुसळधार पाऊस पडतो किंवा घरातील एखाद्याची तब्येत अचानक खराब होऊ शकते. हे वाचा - अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी तुमच्या राशीत काय? पाहा तुमचं आजचं राशिभविष्य तवा योग्य ठिकाणी ठेवा - असे मानले जाते की, तवा राहूचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे जेव्हाही घरात तवा वापरला जातो, तेव्हा तो स्वच्छ केल्यानंतरच वापरावा. काही लोक तवा वापरल्यानंतर तसेच ठेवतात. असे केल्याने तुमच्या जीवनात समस्या येऊ शकतात आणि तुमच्या कुंडलीत राहू दोष देखील येऊ शकतो. तवा नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा जेथे बाहेरील व्यक्तीची नजर थेट तव्यावर पडणार नये. खरंतर शास्त्रानुसार घरातील लोकांच्या व्यतिरिक्त तव्यावर कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीची नजर पडू नये. तव्यावर मीठ शिंपडा - मीठ हे लक्ष्मीचे रूप आहे, असे मानले जाते. त्यामुळे रोटी बनवण्यापूर्वी नेहमी तव्यावर मीठ शिंपडा. असे केल्याने घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. यासोबतच मीठ शिंपडल्याने तवा जंतूमुक्त राहतो. हे वाचा - या गावात जन्माला येतात फक्त मुली, वैज्ञानिकही हैराण; प्रशासनाने उचललं मोठं पाऊल तवा उलटा ठेवू नये - असं मानलं जातं की, घरी रोट्या बनवल्यानंतर तवा कधीही उलटा ठेवू नये किंवा आडवा राहू नये. असे केल्याने राहू दोष वाढू शकतो आणि तुमच्या घरात विविध प्रकारचे संकट येऊ शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.