Home /News /astrology /

Akshay Tritiya च्या शुभ दिनी तुमच्या राशीत काय? पाहा तुमचं आजचं Horoscope

Akshay Tritiya च्या शुभ दिनी तुमच्या राशीत काय? पाहा तुमचं आजचं Horoscope

Akshay Tritiya Horoscope : अक्षय तृतीया. वर्षातला अत्यंत शुभ मुहूर्त आहे. पाहूया आजचे राशीभविष्य.

आज दिनांक 03 मे 2022. वार मंगळवार. आज वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय तृतीया. वर्षातला अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी जल कुंभ दान करण्याचा प्रघात आहे. पितृ देवता पूजन करण्यात येते. सुवर्ण खरेदीचा मुहूर्त आहे. आज चंद्र वृषभ राशीत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य. मेष राशीच्या धन स्थानात आलेला चंद्र अनेक इच्छा आकांक्षा जागृत करेल. त्यावर मेहनत करून यश प्राप्त होईल. मित्र मंडळ मदत करेल. आज प्रवास योग येणार आहे. उत्तम दिवस. वृषभ राशीच्या दशम स्थानात आलेला मंगळ अती शुभ असून अनेक नव्या संधी प्राप्त करून देईल. उत्तम प्राप्ती होईल. अनेक लाभ होतील. दिवस उत्तम. मिथुन व्यय चंद्र मंगळ केंद्र योग असून मन कार्य करण्यास उत्सुक होईल. प्रवास, भेटीगाठी होतील. आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम. कर्क अष्टम स्थानात प्रवेश केलेले मंगळ शनी सावध राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज लाभस्थानात असून मित्रापासून सावध राहा असं सुचवत आहे. दिवस मध्यम. सिंह राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्रमंडळीकडून अनेक लाभ होतील. दिवस शुभ. कन्या सहावा मंगळ शनी आणि भाग्यात चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. शत्रू पिडा होईल. मात्र विजय तुमचाच होईल. दिवस शुभ. तूळ आज दिवस शुभ असून भाग्य उदय होईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षण आणि संततीसाठी शुभ दिवस आहे. वृश्चिक आज दिवस अतिशय जपून राहण्याचा आहे. गृहसौख्य, जोडीदार याबाबत सांभाळून राहा. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस मध्यम फळ देईल. धनु तृतीय स्थानात मंगळ शनी भावंडांशी मतभेद घडवून आणेल. लांबचे प्रवास योग येतील. माहिती मिळेल. साहसी आणि कठोर स्वभाव होईल. जोडीदारासोबत दिवस घालवा. मकर आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ कुंभेत गेल्याने शनी-मंगळ युती झाली असून आर्थिक ताण राहिल आणि कौटुंबिक कलह होतील. दिवस मध्यम. कुंभ राशीमध्ये शनीसोबत मंगळ आहे. अचानक स्वभावात तेज येईल. कार्य करण्याची इच्छा होईल. संतती आनंदी असेल. दिवस उत्तम आहे. मीन व्यय स्थानात मंगळ-शनी आणि राशीत गुरू-शुक्र अशी ग्रहस्थिती खर्च आणि शारीरिक त्रास दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची कामं येतील. दिवस मध्यम. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या