मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आर्थिक समस्यांनी त्रस्त आहात? वास्तुदोष दूर करण्यासाठी लक्षात घ्या 'या' गोष्टी

आर्थिक समस्यांनी त्रस्त आहात? वास्तुदोष दूर करण्यासाठी लक्षात घ्या 'या' गोष्टी

3. गंगाजल- हिंदू धर्मात गंगाजलाचे विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. हिंदू धर्मात गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे पूजास्थळी गंगाजल अवश्य ठेवावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात.

3. गंगाजल- हिंदू धर्मात गंगाजलाचे विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. हिंदू धर्मात गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे पूजास्थळी गंगाजल अवश्य ठेवावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात.

प्रत्येक जण कीर्ती आणि पैसा यांच्या मागे धावत आहे; मात्र अनेकांना प्रयत्न करूनही यश हाती लागत नाही. वास्तुदोष असतील अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

  दिल्ली, 10 डिसेंबर: सध्याच्या काळात अनेकांचं आयुष्य नैराश्याने भरलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही जण कौटुंबिक समस्यांशी दोन हात करत आहेत. प्रत्येक जण कीर्ती आणि पैसा यांच्या मागे धावत आहे; मात्र अनेकांना प्रयत्न करूनही यश हाती लागत नाही. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की वास्तुदोष असतील अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वास्तुदोषांची (How to get rid of Vastu dosha) आणि त्यांच्या निवारणाबद्दलची (Vastu shastra tips) माहिती घेऊ या.

  घर वास्तुशास्त्रानुसार (Vaastu Shastra) असेल, तर चांगली गोष्ट असते. वास्तुशास्त्राच्या मदतीने आर्थिक परिस्थितीत चांगला बदल घडवून आणला जाऊ शकतो, असं तज्ज्ञ म्हणतात. म्हणूनच आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी वास्तु टिप्स (Vastu Tips) देत आहोत. याबाबतची माहिती `टीव्ही 9 हिंदी`ने दिली आहे.

  उत्तरेकडच्या भिंतीला भेग नको

  घराच्या उत्तर दिशेला असलेल्या भिंतीला भेग पडली असेल तर ते अशुभ असल्याचं म्हटलं जातं. घराच्या भिंतीला पडलेली भेग हे तणाव आणि आर्थिक अडचणींचं (Vastu Tips For Money) कारण बनू शकतं.

  आता AI नेच भविष्यात होणाऱ्या आजारांबाबत मिळणार माहिती, अभ्यासातून खुलासा

  त्यामुळे घराच्या भिंतीला भेग पडणार नाही, याची काळजी घ्या. भेग पडलीच, तर ती लवकरच दुरुस्त करून घ्या.

  नळाची दिशा योग्य आहे का

  घरात बसवलेला पाण्याचा नळसुद्धा आर्थिक अडचणींचं कारण असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात उत्तर दिशेला नळ बसवू नये. असं केल्यास आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. म्हणूनच आर्थिक तंगीपासून वाचण्यासाठी उत्तर दिशेला नळ बसवू नये.

  स्वयंपाकघर असं हवं

  घरातलं स्वयंपाकघर हे महत्त्वाचं ठिकाण असतं. स्वयंपाकघर मोकळं, हवेशीर असण्यासोबतच त्याची दिशाही लक्षात घ्यावी. स्वयंपाकघर उत्तर दिशेला असू नये.

  क्या बात है! 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2022 हे वर्ष ठरणार सुपरहिट

  स्वयंपाकघर हे उत्तर दिशेला असेल, तर घरात सुख आणि शांती नांदत नाही. घरातली टॉयलेट्स आणि बाथरूमची दिशा व जागा ठरवताना विशेष खबरदारी घ्यावी. उत्तर दिशेला बाथरूम आणि टॉयलेट उभारू नये.

  देवघराची दिशा

  देवघर उत्तर दिशेला असावं. ते शुभ मानलं जातं. देवघर चुकीच्या दिशेला असल्यास प्रगतीत अडथळा येतो. घरात येणाऱ्या पाहुण्यांसाठी असणारी गेस्ट रूमसुद्धा उत्तर दिशेलाच असावी.

  सूर्याचं राशीपरिवर्तन होणार पुढच्या आठवड्यात; `या` 4 राशींच्या व्यक्तींनी सावध राहा

  वास्तुदोष (vastu dosh) नसले, तर आपलं मन सकारात्मक ऊर्जेने प्रसन्न राहतं आणि घरात सुख-समृद्धी वास करते. घरामध्ये वास्तुदोष असतील, तर कामात नेहमी अपयश येतं आणि मानसिक कष्टही पाठ सोडत नाहीत. वास्तुशास्त्रातल्या उपायांचा अवलंब करून वास्तुदोष दूर करू शकता आणि घरात समृद्धी आणू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Vastu