मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

सूर्याचं राशीपरिवर्तन होणार पुढच्या आठवड्यात; `या` 4 राशींच्या व्यक्तींनी सावध राहा

सूर्याचं राशीपरिवर्तन होणार पुढच्या आठवड्यात; `या` 4 राशींच्या व्यक्तींनी सावध राहा

सूर्य वृश्चिक राशीतून धनु (Sagittarius) या गुरुच्या राशीत प्रवेश करत आहे. याचा परिणाम 4 राशींवर फारसा अनुकूल नसेल. कुठल्या आहेत त्या राशी? कधी होणार राश्यांतर?

सूर्य वृश्चिक राशीतून धनु (Sagittarius) या गुरुच्या राशीत प्रवेश करत आहे. याचा परिणाम 4 राशींवर फारसा अनुकूल नसेल. कुठल्या आहेत त्या राशी? कधी होणार राश्यांतर?

सूर्य वृश्चिक राशीतून धनु (Sagittarius) या गुरुच्या राशीत प्रवेश करत आहे. याचा परिणाम 4 राशींवर फारसा अनुकूल नसेल. कुठल्या आहेत त्या राशी? कधी होणार राश्यांतर?

दिल्ली, 7 डिसेंबर: ग्रह, राशी आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो, असं ज्योतिष शास्त्र (Jyotish Shastra) सांगते. त्यामुळे ग्रहांचं राशी परिवर्तन (Transit) हे महत्त्वाचं मानलं जातं. ग्रहाच्या राशी परिवर्तनाची अनुकूल आणि प्रतिकूल फळे मिळतात, असं ज्योतिष शास्त्राच्या जाणकारांचं म्हणणं आहे. ग्रहांमध्ये सूर्य अर्थात रविला (Sun) महत्त्वाचं स्थान आहे. त्याला ग्रहमालेचा राजा असंही मानलं जातं. त्यामुळे दरमहा होणारं सूर्याचं राशी परिवर्तन प्रत्येक राशीच्या माणसांसाठी महत्त्वपूर्ण असतं. 16 डिसेंबर 2021 रोजी पहाटे 3 वाजून 28 मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीतून धनु (Sagittarius) या गुरुच्या राशीत प्रवेश करत आहे. 14 जानेवारी 2022 पर्यंत सूर्य धनु राशीत असेल. सुर्याचा धनु राशीत प्रवेश झाल्यानंतर बुधादित्य योग होत आहे. हा काही राशींना लाभदायक आहे. परंतु, सुर्याचे धनु राशीतील भ्रमण 12 पैकी 4 राशींसाठी काहीसे प्रतिकूल राहणार आहे. त्यामुळे या 4 राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, असं ज्योतिष शास्त्र अभ्यासकांनी सांगितलं आहे. याबाबतची माहिती `आज तक`ने दिली आहे.

सुर्य 14 जानेवारी 2022 पर्यंत धनु राशीत असेल त्यानंतर तो मकर (Capricorn) राशीत प्रवेश करेल. मात्र धनु राशीतील सूर्याचं भ्रमण विशेषतः 4 राशींसाठी प्रतिकूल असेल.

जेष्ठमधाचा वापर करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा असा होऊ शकतो त्रास

मकर : मकर राशीच्या जातकांसाठी आठव्या स्थानाचा स्वामी सूर्य हा बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत उत्पन्नाच्या तुलनेत अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. कारण आरोग्यविषयक समस्यांवर (Health Issues) अधिक खर्च होऊ शकतो. या कालावधीत तुम्ही पैसे दान करण्याचाही विचार कराल. धार्मिक गोष्टींकडे कल वाढेल आणि या गोष्टींवर मनसोक्त पैसे खर्च कराल.

वृश्चिक (Scorpion) : वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दहाव्या स्थानाचा स्वामी दुसऱ्या स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या व्यवसायातून चांगली कमाई करू शकाल. परंतु, याकरिता तुम्ही चुकीचा मार्ग देखील अवलंबण्याची शक्यता आहे. मात्र अशा गोष्टी करण्यापासून दूर राहवं. शासकीय धोरणांमुळे किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo) : या राशीच्या जातकांसाठी बाराव्या स्थानाचा स्वामी सूर्य चौथ्या स्थानातून भ्रमण करेल. या कालावधीत तुम्ही अनपेक्षित घटनांमध्ये व्यस्त राहाल. तसेच काही वेळा तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक भावुक तर कधी नाराज राहाल. प्रमाणापेक्षा अधिक मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे मनःशांतीसाठी दैनंदिन जीवनशैलीत ध्यानधारणेचा समावेश करावा. या कालवधीत तुमचा आईसोबत वाद होऊ शकतो. त्यामुळे वाद टाळण्यासाठी पुरेपूर काळजी घ्यावी.

मिथुन (Gemini) : या राशीच्या जातकांसाठी तिसऱ्या स्थानाचा स्वामी सूर्य सातव्या स्थानातून गोचर करणार आहे. या कालावधीत तुम्हाला चांगली ऊर्जा जाणवेल. परंतु, कधी-कधी राग देखील अनावर होईल. याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. तुम्ही तुमच्या विनोदबुध्दीनं इतरांना प्रभावित कराल. वैवाहिक जीवन चांगलं राहील. मात्र, खास व्यक्तीसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुरेशी काळजी घ्यावी.

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya