मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /क्या बात है! 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2022 हे वर्ष ठरणार सुपरहिट; सर्व इच्छा होतील पूर्ण

क्या बात है! 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2022 हे वर्ष ठरणार सुपरहिट; सर्व इच्छा होतील पूर्ण

4 राशींच्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये होणार लाभ

4 राशींच्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये होणार लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार (Career Horoscope New Year 2022) 2022 हे वर्ष काही राशींसाठी शिक्षण क्षेत्र, परीक्षा-मुलाखतींसाठी खूपच शुभ ठरणार आहे

  मुंबई, 09 डिसेंबर: डिसेंबर महिना संपत आला असून, नवं वर्ष अगदी काहीच दिवसांवर (New Year 2022) येऊन ठेपलं आहे. नव्या वर्षाकडून सगळ्यांनाच भरपूर अपेक्षा असतात. आयुष्यातल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात आणि येणारं वर्ष आनंदाचं जावं हीच प्रत्येकाची इच्छा असते. विद्यार्थ्यांसाठी वेळ खूप मौल्यवान असतो. विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असेल, याची उत्सुकता असते. ज्योतिषशास्त्रानुसार (Career Horoscope New Year 2022) 2022 हे वर्ष काही राशींसाठी शिक्षण क्षेत्र, परीक्षा-मुलाखतींसाठी खूपच शुभ ठरणार आहे. 'झी न्यूज हिंदी'ने याबाबतची माहिती दिली आहे.

  मीन (Pisces) : दीर्घ काळापासून परदेशात शिक्षण (Education Horoscope) घेण्याचं स्वप्न पाहत असलेल्या विद्यार्थ्यांचं स्वप्न नव्या वर्षात पूर्ण होणार आहे. मीन राशीच्या विद्यार्थ्यांना इच्छित संस्थेत प्रवेश मिळू शकतो. तसंच स्पर्धा परीक्षांचा (Competitive Exams) अभ्यास करणाऱ्यांना यश मिळू शकतं. अर्थात कठोर मेहनतीला पर्याय नाही.

  धनू (Sagittarius): स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. धनू राशीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेत राहावं. इतर विद्यार्थ्यांनादेखील मेहनतीनुसारच फळ मिळेल.

  तूळ (Libra) : तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना नव्या वर्षात यश मिळणार आहे. हे नवं वर्ष तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड ठरू शकतं, असं म्हणता येईल. या राशीच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छासुद्धा नव्या वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

  कन्या (Virgo) : कन्या रास असलेल्या विद्यार्थ्यांना नव्या वर्षात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. परंतु यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. तसंच त्यांचं उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचं स्वप्नदेखील पूर्ण होऊ शकतं.

  गुरूच्या वक्रदृष्टीचे परिणाम; सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिकेला होणार त्रास

  सिंह (Leo) : या राशीचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतील. हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. शाळेतल्या विद्यार्थ्यांन चांगला अभ्यास करावा लागेल. त्यातून ते यशाला गवसणी घालू शकतील.

  वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2022 हे वर्ष शानदार राहणार आहे. त्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होईल. तसंच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.

  मिथुन (Gemini): या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात नवं वर्ष (Year 2022) चांगलं जाईल. मेहनत घेतल्यास यश नक्कीच मिळेल. पुढील शिक्षणासाठी एखाद्या मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. तसंच नोकरीसाठी परीक्षा किंवा मुलाखत देणार्‍यांनाही यश मिळेल.

  ज्योतिषशास्त्रानुसार, या राशींच्या विद्यार्थ्यांसाठी नवं वर्ष उत्तम फळ घेऊन येणार आहे. 2022 मध्ये काही गोष्टी निर्णायक ठरणार आहेत; मात्र त्यासाठी कठोर मेहनतीला, अभ्यासाला पर्याय नाही, हे कायम लक्षात ठेवावं.

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Career, Lifestyle, Rashibhavishya