नवी दिल्ली, 25 मे : काही लोक पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात, परंतु तरीही त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार (According to Astrology) हे कुंडली दोष किंवा वास्तुदोषामुळे (According to Vastu Dosh) होऊ शकते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती नैराश्यात बुडते, पण तुम्हाला माहित आहे का की 1 रुपयाचे नाणे तुम्हाला या सर्व समस्यांपासून मुक्त करू शकते. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्याकडून 1 रुपयाच्या नाण्याचे काही खास उपाय जाणून घेऊया, जे केल्याने लवकरच आपली आर्थिक संकटातून सुटका होईल. जाणून घेऊया काही खास उपाय.
त्रास संपवण्यासाठी -
मूठभर तांदळात 1 रुपयाचे नाणे घेऊन कोणत्याही मंदिरात जा आणि तुमचा त्रास सांगून मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यात शांतपणे ठेवा. असे केल्याने तुमच्या समस्या लवकर दूर होतील.
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी -
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी शुक्रवारी आपल्या घरातील देव्हाऱ्यात देवासमोर एक चौकोन बनवा आणि त्यावर पाण्याने भरलेले कलश ठेवा आणि त्या कलशावर कुंकू लावून स्वस्तिक बनवा आणि त्यावर 1 रुपयाचे नाणे लावा. असे केल्याने घरातील आर्थिक संकटातून लवकर सुटका होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
हे वाचा -
पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार
घरातील गरिबी दूर करण्यासाठी -
रोज संध्याकाळी पूजा केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या कोपऱ्यात तुपाचा चार तोंडी दिवा लावा आणि या दिव्यात एक रुपयाचे नाणे टाका. असे केल्याने घरातील गरीबी दूर होते, तसेच घरातील नकारात्मक उर्जाही संपते.
हे वाचा -
Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम
भाग्य चमकण्यासाठी -
नशीब बळकट होण्यासाठी आपल्या खिशात नेहमी मोराची पिसे आणि एक रुपयाचे नाणे ठेवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने भाग्य बळवान होईल. जीवनात नवीन संधी उपलब्ध होतील आणि अचानक पैसे मिळण्याची शक्यताही निर्माण होऊ लागेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.