Home /News /lifestyle /

पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; उन्हाळ्यात केसांची अशी घ्या काळजी

पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; उन्हाळ्यात केसांची अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात पुरुषांच्या केसांसाठी वीगन हेयर मास्क कसा बनवायचा त्याविषयी जाणून घेऊया. ज्याच्या मदतीने तुम्ही केसांची प्रत्येक समस्या दूर करू शकता आणि केस निरोगी करू शकता.

  मुंबई, 23 मे : उन्हाळ्यात मुलांचे केसही कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यामुळे खराब होतात, त्यामुळे केसांच्या अनेक समस्या सुरू होतात. उन्हामुळे बहुतेक मुलांचे केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. केसांच्या आरोग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाजारातील रासायनिक प्रॉडक्टसचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत काही वीगन हेयर मास्क (Vegan hair mask) मुलांचे केस निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, त्याविषयी जाणून (Hair Care Tips For Men) घेऊया. सामान्यतः असे दिसून येते की, बहुतेक पुरुष केसांची काळजी घेण्यासाठी बाजारातील महागडी हेअर प्रॉडक्टस् वापरत असतात. त्यांचे साईड इफेक्टस आणि उष्णतेमुळे केसच खराब होत नाहीत तर केस गळतीही सुरू होऊ शकते. म्हणूनच आज आपण केसांसाठी वीगन हेयर मास्क कसा बनवायचा ते सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही केसांची प्रत्येक समस्या दूर करू शकता आणि केस निरोगी करू शकता. नॉर्मल केसांवर ट्राय करा - नॉर्मल केसांवर व्हेज हेअर मास्क लावण्यासाठी एका भांड्यात 1 चमचा ओट्स, 1 चमचा बदामाचे दूध, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल आणि 1 चमचा खोबरेल तेल मिसळा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि 20 मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. हे मिश्रण केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. रात्री लावा वीगन हेयर मास्क - रात्रभर वीगन हेयर मास्क वापरण्यासाठी 4 चमचे कोमट खोबरेल तेल अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा आणि केस आणि डोक्याची मालिश करा. रात्रभर केसांवर राहू द्या आणि सकाळी सौम्य शाम्पूने केस धुवा आणि कंडिशनर लावा. यामुळे डोक्याच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि केसही निरोगी होतात. हे वाचा - Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या
  केसांचा गुंता सुटेल - गुंतलेले आणि कुरळ्या केसांवर वीगन हेयर मास्क लावण्यासाठी, 1 पिकलेले केळ मॅश करा आणि 1 चमचा ऑलिव्ह तेल, 1 चमचा खोबरेल तेल आणि 1 चमचा कच्चा मध घालून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट केसांना चांगली लावा आणि अर्ध्या तासानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. केसांच्या वाढीसाठी - केसांच्या वाढीला गती देण्यासाठी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक करून त्याची प्युरी बनवा. आता त्यात 1 चमचा खोबरेल तेल मिसळा आणि केसांना लावा. 15 मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूने धुवा आणि कंडिशनर लावा. यामुळे केस लवकर वाढतील. हे वाचा -  Cardamom Benefits: वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी
  तेलकट केसांसाठी - तेलकट केसांवर वीगन हेयर मास्क लावण्यासाठी 2 चमचे कच्चा मध 1 चमचे एलोवेरा जेल आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण केसांना चांगले लावा आणि 15 मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. यामुळे केसांची पीएच पातळी राखली जाईल आणि तेलकट केसांपासून सुटका मिळेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health, Health Tips

  पुढील बातम्या