नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर: रामायणात लंकाविजय हा महत्त्वाचा भाग आहे. सीतेचं अपहरण आणि रावण यांचं आजच्या श्रीलंकेशी खूप जवळचं नातं आहे. सीतेला रावणानं पळवून नेलं आणि त्याच्या सोन्याच्या लंकेत ठेवलं असं मानलं जातं. वनवासात असलेल्या सीतेला रावणानं आपल्या पुष्पक विमानातून पळवलं, अशी कथा आहे.
जगात सर्वप्रथम रावणानं (Ravana the first aviator) विमानाचा वापर केला हे सिद्ध करण्यासाठी श्रीलंका आता विशेष संशोधन प्रकल्प (Special Research Project) हाती घेणार आहे. जगातलं पहिलं विमान रावणानेच चालवलं अशी अनेक श्रीलंकावासीयांची श्रद्धा आहे. इतकंच नाही, तर रावण (Ravan) सत्ताधीश असताना त्याच्याकडे हे स्वत:चं विमान आणि विमानतळही होता असाही दावा केला जातो. ही केवळ पुराणातील मिथकं आहेत आणि त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही असा दावा केला जातो. त्यामुळेच आता श्रीलंकेतल्या काही उत्साही संशोधकांकडून हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. रावणानं सीतेचं अपहरण हवाईमार्गे केल्याचं सर्वश्रुत आहे. या हवाईमार्गे रावण स्वत:च्या विमानातून सीतेला पळवून श्रीलंकेला घेऊन आला असा दावा श्रीलंकेच्या वतीनं केला जातो.
Twins Island : या गावात सर्वत्र दिसतात जुळी मुलं, माणसं; रहस्यामागील कारण काय?
दोन वर्षांपूर्वी कोलंबोत नागरी हवाई तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्त्व शास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक यांची एक परिषद झाली. त्या वेळेस या कल्पनेला जोरदार पाठिंबा देण्यात आला. श्रीलंकेतून भारतात जाण्यासाठी आणि भारतातून परत श्रीलंकेत येण्यासाठी रावणानं त्याच्या विमानानंच प्रवास केला होता असा निष्कर्ष या परिषदेत काढण्यात आला. हेच जगातलं पहिलं विमान होतं असा दावा केला जातो.
या परिषदेनंतर हे संशोधन सुरू करण्यासाठी श्रीलंकन सरकारनं सुरुवातीला पन्नास लाख श्रीलंकन रुपयांचा निधी मंजूर केला. कोविड आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे हे संशोधन काही काळ थांबलं. आता सध्याच्या राजपक्षे सरकारला पुन्हा या संशोधनात रस आहे. हा प्रकल्प राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्यानं प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 'पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला संशोधक काम पुन्हा सुरू करतील अशी अपेक्षा आहे,' असं श्रीलंकेच्या नागरी हवाई वाहतूक प्रधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी दाणातुंगे यांनी म्हटलं आहे.
प्रत्यक्षात कसा दिसतो देवाचा चेहरा? वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच आणलं हे चित्र समोर
शशी हे श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाचे माजी सीईओ आणि इतिहासाचे अभ्यासकही आहेत. देशाचा हवाई उड्डाणाचा मागोवा आणि पुरावे शोधण्यासाठी शशी यांनी संपूर्ण देशभर प्रवास केला आहे. 'रावण हे फक्त पुराणातलं एक पात्र नव्हतं तर तो खराखुरा राजा होता. त्याच्याकडे स्वत:चं विमान आणि विमानतळही होते याची मला खात्री पटली आहे. अर्थात सध्याच्या काळात आहेत तशी ती विमानं आणि विमानतळ नसतील; पण ते होतं हे खरं आहे. अर्थात प्राचीन काळात श्रीलंका आणि भारतातल्या काही लोकांना काही अत्यंत प्रगत तंत्रज्ञान अवगत होते हे निश्चित. त्यावर वस्तुनिष्ठ संशोधन होणं गरजेचं आहे,' असंही दाणातुंगे म्हणाले आहेत.
भारत आणि श्रीलंकेच्या प्राचीन काळातल्या या प्रगतीबद्दल सर्वांना माहिती व्हावी यासाठी भारतानंही श्रीलंकेला साथ द्यावी अशी विनंती शशी यांनी भारत सरकारला केली आहे.
या संशोधनासाठी शशी हे एकटेच आग्रही नाहीत. श्रीलंकेचे आघाडीचे पर्यावरणवादी वास्तुरचनाकार सुनेला जयवर्धने यांनीही त्यांच्या ‘The Line Of Lanka - Myths & Memories of An Island’ या पुस्तकात रावणाच्या हवाई उड्डाणाबद्दल अत्यंत उत्कटतेने लिहिलं आहे.
हृदय विकारांसह BPसुद्धा राहील नियंत्रणात; हिवाळ्यात मुळा खाण्याचे आहेत खूप फायदे
“सध्याच्या जगात रावणाचं विमान ही निव्वळ एक कल्पना असल्याचं मानलं जातं. अमेरिकेच्या राइट बंधूंनी जगातल्या पहिल्या विमानाचा शोध लावला असं प्रत्येक साक्षर, सुशिक्षित माणसाला वाटतं; मात्र फक्त पाश्चिमात्य देशांकडेच आधुनिक तंत्रज्ञान होतं अशा प्रकारचा समज गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक पसरवला गेला आहे. तशी मानसिकताच तयार करण्यात आली आहे. त्यामुळेच हा समज आहे, ” असं त्यांचं म्हणणं आहे.
या प्राचीन विमानाबद्दल काही प्राचीन नोंदींमध्ये अत्यंत सविस्तरपणे आणि तांत्रिकदृष्ट्या माहिती देण्यात आली आहे. त्यामुळेच त्याला केवळ मिथक मानता येणार नाही. त्यांचे काका स्वर्गवासी रे विजयवर्धने हे आद्य आधुनिक वैमानिक मानले जातात. त्यांनीही या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
“मला हे प्राचीन हवाई उड्डाण आणि विमानाबद्दल काही शंका होत्या. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की रावणाच्या वंशातल्या म्हणजेच मयुरांगा राजांकडे त्यांची विमानं आणि विमानतळ होते यावर त्यांचाही विश्वास आहे, तेव्हा माझे सगळे संशय फिटले. त्यांच्याकडे त्यांची विमानं (gliders) होती आणि त्यासाठी धावपट्टीची गरज होती असं नाही तर अगदी पाण्यावरही ती विमानं उतरवली जात असत,” असंही त्यांनी लिहिलं आहे.
ही विमानं उतरवण्यासाठी काही जागा होत्या असा संदर्भ असल्याचंही त्यांनी लिहिलं आहे. थोटुपोलकांधा आणि उस्सांगोडा, वेहेरांगथोटा, रुमासाला आणि लेकगाला या श्रीलंकेतल्या जागांचे संदर्भ आढळत असल्याचा त्यांचा दावा आहे.
श्रीलंकेत आता रावण आणि आणि त्याच्या राज्याबद्दल पुन्हा एकदा आवर्जून रस घेतला जात आहे. श्रीलंकेत रावणाला खलनायक म्हणून नाही तर शक्तिशाली राजा म्हणून गौरवण्यात येतं. अनेक ठिकाणी त्याची पूजाही केली जाते. रावणाचा गौरव करण्यासाठी म्हणूनच श्रीलंकेनं अंतराळात पाठवलेल्या उपग्रहालाही ‘रावण’ हेच नाव दिलं आहे.
या शहरात प्रत्येक तरुणाला असतात 3 Girlfriends, मुलीच करतात खर्च
रामायणातले महत्त्वाचे संदर्भ असलेली श्रीलंका जगभरातल्या रामायणप्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र आहे. सीतेला ठेवलेलं अशोकवन, रावणाची सोन्याची लंका अशा अनेक गोष्टी मिथकं आहेत की सत्य यावर मतमतांतरं आहेत; पण श्रीलंकेनं पुन्हा हा प्रकल्प हाती घेऊन त्यावर पुन्हा चर्चा सुरू केली आहे हे महत्त्वाचं. मुख्यत: पर्यटनावर अवलंबून असलेल्या श्रीलंकेनं हे संशोधन हाती घेणं हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.