• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • एखाद्या व्यक्तीला वर्षभरात किती घाम येतो? उत्तर ऐकून तुम्हालाही घाम फुटेल

एखाद्या व्यक्तीला वर्षभरात किती घाम येतो? उत्तर ऐकून तुम्हालाही घाम फुटेल

घाम येण्यामुळं शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. प्रत्येक मानवी शरीर बॉडी मेंनटेन राखण्यासाठी घाम गाळते. पण तुम्हाला माहीत आहे का की, एखादी व्यक्ती एका वर्षात किती घाम येतो? याचं उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : घाम येणं हा मानवी जीवनाचा एक सामान्य भाग आहे. घरातील कामे करताना असो किंवा व्यायाम करताना मानवी शरीराला घाम (Sweating) येतो. अनेक वेळा वैद्यकीय परिस्थितीमुळे कुणाच्या शरीरातून जास्त घाम येतो तर कुणाच्या शरीरातून कमी येतो. मात्र, निसर्गानं प्रत्येक गोष्टीला कारण दिलं आहे. आज आपण घाम येणं शरीरासाठी कसं चांगलं आहे हे जाणून (How Much Sweat In Year) घेऊयात. तसेच, एखाद्या व्यक्तीला वर्षभरात किती घाम येतो? याचे उत्तरही मिळेल. शरीरातून घाम येणं ही चांगली गोष्ट आहे. यामुळे शरीरासाठी अनेक फायदे होतात. सहसा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की, त्याचे कपडे घामाने ओले झाले आहेत. पण त्याच्या अंगातून किती घाम निघाला हे त्याला कळत नाही? स्किनकेअर फर्म निव्हियाने आता याचं उत्तर सांगितलं आहे. हे उत्तर तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. आपल्या नवीन संशोधनानंतर, निव्हियाने सांगितले की, एक व्यक्ती एका वर्षात 278 गॅलन म्हणजे जवळपास 1052 ते 1264 लिटर घाम गाळते. हे वाचा - Car Offer: कार खरेदीवर 50000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स, YONO SBI ची खास ऑफर हा आकडा सामान्य भाषेत सांगायचा झाला तर एका व्यक्तीला एका वर्षात सुमारे 5 बादल्या घाम येतो. म्हणजे सुमारे 2 लाख 56 हजार 445 चमचे घाम. स्किनकेअर कंपनीने सांगितले की, 15 ते 82 लोकांचा घाम एकाच ठिकाणी जमा केला तर त्यातून एक छोटा तलाव तयार होऊ शकतो. लंडनचे एक मत्स्यालय फक्त घामानं भरलं जावू शकतं. घामाचे हे प्रमाण सामान्य व्यक्तीसाठी असते. जर एखादी व्यक्ती व्यायाम करत असेल तर घामाचे प्रमाण वाढते. हे वाचा - Smartphone पाण्यात पडल्यास अशी घ्या काळजी, अजिबात करु नका या गोष्टी जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक क्रिया करत असते तेव्हा त्याच्या शरीराला तासाभरात अर्धा ते दोन लिटर घाम येतो. त्याच वेळी, ज्यांना खूप घाम येतो, ते सुमारे तीन लिटर घाम गाळतात. या अहवालात घामाशी संबंधित अनेक तथ्ये समोर आली आहेत. महिलांमध्ये घामाच्या ग्रंथी जास्त असल्या तरी पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त घाम येतो, असे सांगण्यात आले. याशिवाय घाम येणं हे हवामान आणि लठ्ठपणा यावरही अवलंबून असतं.
  Published by:News18 Desk
  First published: