Home /News /lifestyle /

Vastu Tips: घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

Vastu Tips: घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

या वनस्पतीला घरामध्ये ठेवल्याने कोणते फायदे होतात आणि ते कोणत्या दिशेला ठेवणे शुभ मानले (Snake Plant Benefits) जाते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्नेक रोपटे लावल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते. हे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत नाही. आपल्या जीवनातील अनेक समस्या टाळण्यासाठी वास्तुशास्त्र अनेक उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रात घरात ठेवलेल्या सजीव आणि निर्जीव वस्तूंबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांनी स्नेक रोपांबद्दल माहिती दिली आहे. या वनस्पतीला घरामध्ये ठेवल्याने कोणते फायदे होतात आणि ते कोणत्या दिशेला ठेवणे शुभ मानले (Snake Plant Benefits) जाते. प्रगती आणि संपत्तीसाठी - वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्नेक रोपटे लावल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते. हे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते. त्याच्या सकारात्मक प्रभावाने घरात धनाच्या आगमनाचा मार्ग वाढतो. कुटुंबात प्रेम वाढेल - वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये स्नेक रोपाचा प्रभाव असा असतो की, घरातील वातावरण प्रसन्न होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम-सद्भाव वाढेल. स्नेक प्लांट हे नैसर्गिक हवा शुद्ध करणारे मानले जातात. या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती घरात लावल्याने मानसिक शांती आणि आराम मिळतो. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लांट लावल्याने नोकरी आणि व्यवसायात फायद्याची संधी मिळते. जर तुमच्या मुलांना अभ्यास करायला आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर स्नेक प्लांट ठेवू शकता, यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल. याशिवाय, जर तुम्हाला ऑफिसमध्ये चांगले वाटायचे असेल तर तुम्ही तुमच्या टेबलावर स्नेक प्लांट ठेवू शकता. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार स्नेक प्लांट कोणत्या दिशेला ठेवावे - वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लांट लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा ही दक्षिण-पूर्व कोन, दक्षिण किंवा पूर्व दिशा मानली जाते. स्नेक प्लांट कधीही इतर कोणत्याही रोपासोबत ठेवू नये. जर तुम्ही ते लिव्हिंग रूममध्ये ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला ही वनस्पती दिसेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Vastu

    पुढील बातम्या