नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : मी प्रेमात पडलोय, असं तुम्हाला कोणीतरी तुमच्या मित्र-सहकाऱ्यानं कधी ना कधी म्हटला असेल. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आकर्षण हे नेहमीच प्रेम असतं, असं नव्हे. कधी कधी हे आकर्षण फक्त वासनेमुळेही (Sexual Attraction) होऊ शकते. या प्रेमात कोणीतरी उत्कटतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याच्या कथा आपण अनेकदा ऐकल्या असतील. असे नाही की केवळ प्रेमात बुडालेली व्यक्तीच असे करते, परंतु अनेकदा अशा प्रकरणांमध्ये प्रेमाऐवजी वासनेचे वर्चस्व असते. जर तुम्ही देखील एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होत असाल तर तुम्ही खरोखरच त्याच्यावर प्रेम (Love) करत आहात की, केवळ वासनेमुळे (Sexual Attraction) आकर्षित झाला आहात, हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप (Valentine’s Day Special) महत्त्वाचं आहे. इनसाइडरच्या वृत्तानुसार, प्रेम आणि वासना यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे वासना ही पूर्णपणे लैंगिक आकर्षण (Sexual Attraction) असते. तर एखाद्यावर प्रेम असणं म्हणजे शारीरिक आकर्षणापेक्षा त्या व्यक्तीचं फक्त सोबत असणं, त्याच्याविषयी आपलेपणाची भावना या गोष्टी मनातून येणं असतं. एखाद्याबद्दलचे आकर्षण हे प्रेम किंवा वासना आहे हे जाणून घ्या? - जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ फक्त शारीरिक जवळीक साधण्यासाठी घालवत असाल, पण तुम्हाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात फारसा रस नसेल आणि तुमची विचारसरणी वेगळी असेल, तर ही वासनेची लक्षणं आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल भावनिकदृष्ट्या सुरक्षित असणं, आपल्या जोडीदाराच्या मित्रांना आणि त्याच्या/तिच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यात स्वारस्य दाखवणं आणि नातेसंबंधात सुरक्षित वाटणं हे आपल्या जोडीदारावरील प्रेमाचं लक्षण आहे. हे वाचा - तुम्हाला माहीत आहे का? Romantic relationships मुळं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं वासना एखाद्याच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्याशी संबंधित आहे. वासना लैंगिक समाधानाशी संबंधित आणि हार्मोन्समुळं निर्माण होणाऱ्या इच्छेद्वारे चालविली जाते. त्याच वेळी, आकर्षण, उत्तेजित भावना, भावनिक आसक्तीतून समाधान आणि जोडीदाराबद्दल विचार करण्याशी जोडलेलं आहे. हे वाचा - Relationship : या गोष्टींवरून ओळखा तुमचं प्रेम, नातं एकतर्फी तर नाही ना? असे पडू शकाल बाहेर - अलेक्झांड्रा स्टॉकवेल कोचिंग अँड कन्सल्टिंगच्या एमडी आणि रिलेशनशिप एक्सपर्ट अलेक्झांड्रा स्टॉकवेल म्हणतात की, ‘प्रेम आणि वासना यांच्यातील सर्वात सामान्य फरक म्हणजे वासना पूर्णपणे शारीरिक आणि लैंगिक असते; तर, प्रेमामध्ये लैंगिक समाधान तसंच जोडीदाराची काळजीची भावना देखील समाविष्ट असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.