मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

औषधी गुळाचे आहेत बरेच फायदे; आरोग्याबरोबर त्वचेसाठीही उपयोगी

औषधी गुळाचे आहेत बरेच फायदे; आरोग्याबरोबर त्वचेसाठीही उपयोगी

आयुर्वेदातही (Ayurveda) गुळाच्या औषधी गुणधर्मांना (Medicinal Properties) मान्यता आहे. सर्दी खोकल्या सारख्या आजारात गुळ आणि हळद खायला सांगितली जाते.

आयुर्वेदातही (Ayurveda) गुळाच्या औषधी गुणधर्मांना (Medicinal Properties) मान्यता आहे. सर्दी खोकल्या सारख्या आजारात गुळ आणि हळद खायला सांगितली जाते.

आयुर्वेदातही (Ayurveda) गुळाच्या औषधी गुणधर्मांना (Medicinal Properties) मान्यता आहे. सर्दी खोकल्या सारख्या आजारात गुळ आणि हळद खायला सांगितली जाते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : गुळ खाण्याचे आरोग्यासाठी किती फायदे (Health Benefits) आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. गुळ चवीलाही चांगला (Test) लागतो शिवाय नुसताही खाता येतो. साखरेपेक्षा गुळ पौष्टीक (Nutritious) असतो. त्यामुळे काहीजण आहारात (Diet) गुळाचाच वापर जास्त करतात. त्यामुळे आयुर्वेदातही (Ayurveda) गुळाच्या औषधी गुणधर्मांना (Medicinal Properties) मान्यता आहे. सर्दी खोकल्या सारख्या आजारात गुळ आणि हळद खायला सांगितली जाते. गुळात कॅलरीज कमी(Low Calories) असतात.

प्रोटीन, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 6, फॉलेट,  कॅल्शिअम,  लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यासारखे पोषक घटक गुळामध्ये आहेत. गुळात मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं. त्यामुळे शरीरात  इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित राहते. अन्न पचवण्याची क्षमता वाढण्यासही मदत मिळते. गुळात पोषण तत्त्वांचा साठा आहे. गुळातील पोषक घटकांमुळे मूड चांगला राहतो. गुळामुळे शरीरात अ‍ॅडोर्फिन हार्मोनचा स्राव होतो, ज्यामुळे शरीर रिलॅक्स होतं. त्यामुळे पचनशक्ती सुधारल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी गुळ खाणं लाभदायक असतं.

(पावसाळ्यात वाढला माशांचा त्रास? अशा घरगुती स्प्रेने एकही माशी घरात येणार नाही)

गुळ यकृत डिटॉक्सिफाय करतं आणि हिमोग्लोबिन वाढवतं. गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळात  कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहतं. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणं उपयुक्त ठरतं.

(टेन्शनमुळे दुखतंय डोकं? चंदनाचा लेप संपवेल वेदना; या पद्धतीने वापर करा)

चेहऱ्यासाठी वापरा गुळ

गुळात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सुक्रोज, ग्लूकोज, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि मॅग्नेशियम असतं. गुळातले हे व्हिटॅमिन आणि मिनरल्स त्वचेसाठी क्लिंजर म्हणून काम करतात. गुळामुळे पोट साफ होतं. पोटं साफ असेल तर, त्वचाही तजेलदार दिसते. कोमट पाण्याबरोबर गुळ घेतल्यास फायदेशीर ठरतो.

('मला जेलमध्ये टाका पण माझ्या बाळाला वाचवा', चिमुकल्या लेकासाठी बापाची आर्त हाक)

चेहऱ्यावच्या सुरकूत्या

1 चमचा गुळ पावडरमध्ये, 1 चमचा ग्रीन टी घाला, 1 चमचा द्राक्षांचा रस, एक चिमुट हळद आणि थोडसं गुलाबपाणी घाला. हे मिश्रण 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि थंड पाण्याने धुवून टाका. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या लवकर कमी होती.

(त्वचेवर चट्टे उठून खाज येत असेल तर करा ही टेस्ट; दुर्लक्ष केल्याने अवघडतील सांधे)

डाग कमी होतात

1 चमचा गुळ पावडरमध्ये 1 चमचा टॅमेटोच्या रस, लिंबाचा रस आणि एक चिमुट हळद घालून एकत्र करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुऊन टाका.

First published:

Tags: Home remedies, Lifestyle, Skin care