मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अंडं खाऊन फेकू नका कवच; लांबसडक केसांसाठी तयार करा हेयर मास्क

अंडं खाऊन फेकू नका कवच; लांबसडक केसांसाठी तयार करा हेयर मास्क

अंडं वापरल्यावर किंवा खाल्ल्यानंतर त्याचं कवच (Shell) आपण फेकून देतो. खरंतर, या कवचामध्येच जास्त कॅल्शियम असतं. ज्याचा वापर केसांसाठी (Hair) करता येतो.

अंडं वापरल्यावर किंवा खाल्ल्यानंतर त्याचं कवच (Shell) आपण फेकून देतो. खरंतर, या कवचामध्येच जास्त कॅल्शियम असतं. ज्याचा वापर केसांसाठी (Hair) करता येतो.

अंडं वापरल्यावर किंवा खाल्ल्यानंतर त्याचं कवच (Shell) आपण फेकून देतो. खरंतर, या कवचामध्येच जास्त कॅल्शियम असतं. ज्याचा वापर केसांसाठी (Hair) करता येतो.

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट :  रोज एक अंडं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits) आहे. याशिवाय शरीरासाठी किंवा केसांसाठी आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी (Skin Beauty) अंडं खाण्याचे फायदे आहेत. अंड्याचा हेअर पॅकसाठी (Egg Hair Pack) वापर केला जातो. पण, अंड्याबरोबर याच्या कवचाचा (Egg Shell) केसांच्या आरोग्यासाठी वापर होऊ शकतो.

अंड्याच्या कवचामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि न्युट्रिशन (Consume & Nutrients) असतात. त्यामुळे केसांची मुळं कमजोर (Weak Hair Roots) होऊन केस गळत असतील तर, अंड्याच्या कवचाचा वापर हेयर मास्क (Hair Mask) म्हणून करता येऊ शकतो.

(पावसाळ्यात डोळ्यांच्या Infectionची भीती जास्त; या पद्धतीने घ्या काळजी)

केस हेल्दी ठेवण्यासाठी मास्क तयार करायचा असेल तर, अंड्याच्या कवचाची पावडर आणि दही वापरून हेयर मास्क तयार करता येऊ शकतो.

(साध्या सवयीही करतात मेंदूवर भयंकर परिणाम; आजच सोडा नाहीतर पस्तवाल)

1

अंड्याचे कवच वाळवून मिक्सरमधून त्याची पावडर तयार करून घ्या. हेअर मास्क तयार करताना 2 चमचे अंड्याच्या कवाचाची पावडर आणि 2 चमचे दही एकत्र करा. चांगली पेस्ट तयार करून केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. 45 मिनीटानंतर केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा नियमितपणे या हेयर पॅकचा वापर केला तर केस मुलायम आणि सॉफ्ट होतात.

(लॉटरीच! फक्त 86 रुपयात इटलीत मिळणार स्वत:चं घर; पाहा कसं खरेदी करायचं)

2

ऑयली स्काल्पसाठी सुद्धा हेयर मास्क वापरता येऊ शकतो. अंड्याच्या कवचाची पावडर आणि अंड्याचा सफेद भाग एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. अर्ध्या तासानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवा. केसांमधील तेलकटपणा कमी होईल.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Proper care, Woman hair