मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पावसाळ्यात डोळ्यांच्या Infectionची भीती जास्त; या पद्धतीने घ्या काळजी

पावसाळ्यात डोळ्यांच्या Infectionची भीती जास्त; या पद्धतीने घ्या काळजी

पावसाळ्यामध्ये डोळ्यांचे विकार वेगाने वाढतात.

पावसाळ्यामध्ये डोळ्यांचे विकार वेगाने वाढतात.

पावसाळ्यामध्ये इतर आजारांबरोबर डोळ्यांचाही त्रास (Eye Problems) वाढू शकतो. यापासून वाचण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : पाऊस आला कि सगळ्यात मोठा दिलासा मिळतो तो वाढलेल्या उष्णतेपासून (Heat). उन्हाळ्यापासून(Summer)आपली सुटका होते खरी पण, याच काळात आजार वाढण्याची भीती जास्त असते. पावसामध्ये व्हायरल इन्फेक्शनची (Viral Infection) भीती असते. त्याशिवाय माशा, डास यांची पैदास वाढल्यामुळे सर्दी-खोकला (Caught & Cold) यासारखे आजार होतात. शिवाय दूषित पाण्यामुळे काविळ, कॉलरासारखे त्रास होऊ शकतात.

शिवाय डोळ्यांचं इन्फेक्शन (Eye Infection) होण्याची भीती असते. शरीराचा अतिशय नाजूक भाग असलेल्या डोळ्यांना हे संक्रमण त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे इन्फेक्शन टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करायला हव्यात. जाणून घेऊयात काय करावं.

डोळ्यांची स्वच्छता

पावसाळ्याच्या वातावरणामध्ये दमटपणा आलेला असतो. त्यामुळे डोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. दिवसातून दोनदा चेहरा धुवताना डोळे धुवायला हवेत. त्यामुळे डोळ्यांमध्ये साठलेली घाण निघून जाऊन डोळे साफ राहतात.

(ताजे मासे खरेदी करण्याच्या खास टिप्स; अशी घ्या ताजी मासळी)

पूर्ण झोप

डोळ्यांचं इन्फेक्शन टाळायचं असेल तर, त्यासाठी पूर्ण झोप घेणं आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो. आपल्या शरीरातल्या इतर अवयावांबरोबर डोळे देखील दिवसभर काम करत असतात. त्यामुळे त्यांना पूर्ण आराम मिळणं आवश्यक असतं.

धूळ आणि थंड हवेपासून वाचण्याचा प्रयत्न करा

वातावरणातली धुलीकण देखील डोळ्यांच्या इन्फेक्शनसाठी कारणीभूत असतात. दमट हवामानामुळे धूळीचे कण जास्त घातक ठरू शकतात. त्यामुळे धूलिकण आणि थंड हवेपासून दूर डोळ्यांचा बचाव करायला हवा. शक्यतो घराबाहेर पडताना डोळ्यांवर संरक्षणासाठी चष्मा लावावा. हल्ली फेस शील्डचाही वापर केला जातो.

(हे 7 पदार्थ आहेत अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स पॉवर हाउस; आजारापणापासून बचावासाठी रोज घ्या)

कंप्यूटर आणि मोबाइल पासून ब्रेक घ्या

सध्याच्या परिस्थितीमध्ये मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर वाढलेला आहे. कामाच्या निमित्ताने सुद्धा कम्प्युटर लॅपटॉप यावर जास्त वेळ घालवाव लागतो. कॉम्प्युटर मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करताना थोडा थोडा ब्रेक घेतल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

('सुपर टेस्टर'ला गवसला कोरोनामुळे गमावलेला गंध; वासाची क्षमता परत मिळवण्याचा उपाय)

कॉस्मेटिक टाळा

पावसाळ्यामध्ये डोळ्यांचे विकार वेगाने वाढतात. अशा परिस्थितीत संरक्षणासाठी कॉस्मेटिक वापरू नये. याशिवाय इतरांनी वापरलेली कॉस्मेटिक जरूर टाळावेत.

First published:

Tags: Eyes damage, Health Tips, Lifestyle