नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : पूर्वीचं राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी आणि आत्ताची राहण्याची पद्धत पूर्णपणे बदलून गेली आहे. पूर्वीच्या काळात एक आदर्श राहणीमानाची पद्धत होती. ती आता धकाधकीच्या जीवनामध्ये आपण फॉलो करू शकत नाही. तेव्हाच्या काळातल्या सवयी आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits) असल्या तरी आत्ताच्या आयुष्यामध्ये (Today Life) त्यांचा वापर अशक्य आहे. पण, आपल्या या बदललेल्या सवयी (Habits) आपल्या आयुष्यावर, शरीरावर आणि मेंदूवर देखील सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम (Positive & negative Effect) करतात. म्हणजेच हाइपरकनेक्टिविटी (Hyperconnectivity) वेगाने आपल्या मेंदूवर परिणाम (Effect on Brain) करते आहे.
त्यामुळे आपण आपले प्रॉडक्टीविटी (Productivity) कमी होते आहे. आरोग्याचा विचार करताना नेहमीच शरीरासाठी फायदेशीर गोष्टींचा विचार केला जातो. पण, मेंदूसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांवर (Nutrients) फार कमी वेळा लक्ष दिलं जातं. आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, राहणीमानाच्या चुकीच्या सवयी आपलं मानसिक स्वास्थ (Mental Health) कमजोर करत आहेत. आपला मेंदू चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आपण चांगल्या सवयी लावायला हव्यात. ज्यांना काही मानसिक त्रास किंवा मेंदू संदर्भातले विकार आहेत त्यांना देखील सवयींमध्ये बदल करणं फायदेशीर (Change In Habits) ठरू शकतं.
(Good Fats साठी मासेच खायला हवे असं नाही, हे शाकाहारी पदार्थही आहेत फायदेशीर)
निष्क्रियता
शरीराकडून योग्य पद्धतीने काम करून घेतलं नाही तर, अनेक विकार जडतात. म्हणजे काही न करता सुस्त पडून राहणही घातक असतं. हृदयरोग, लठ्ठपणा, डिप्रेशन, स्मृतीभ्रंश, कॅन्सर असे आजार त्यामुळे होतात. बरेच लोक आपल्या बिझी शेड्युल मध्ये फिजिकल आणि मेन्टल अॅक्टिव्हिटीसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्यांचं शरीर आणि मेंदू यांचं कार्यदेखील मंद व्हायला लागलेलं आहे. मेंदू आणि शरीराला चालना देण्यासाठी सायकल चालवणं, स्ट्रेचिंग, व्यायाम करणं अशा अॅक्टिव्हिटी करायला हव्यात.
(ताजे मासे खरेदी करण्याच्या खास टिप्स; अशी घ्या ताजी मासळी)
मल्टिटास्किंग
स्मार्टफोन आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. आपण सातत्याने स्मार्टफोनचा वापर करतो. ट्रेन मध्ये बसलेले असताना. रस्त्यावर चालताना सुद्धा काही लोकांना हेडफोन लावून मोबाईलवर काही ऐकण्याची सवय असते. कधीकधी घरीसुद्धा हातात फोन घेऊन आपण मोबाईल बघतो. सतत मोबाईलच्या वापरामुळे आणि मल्टिटास्किंगने आपली प्रोडक्टीविटी कमी होत आहे.
('सुपर टेस्टर'ला गवसला कोरोनामुळे गमावलेला गंध; वासाची क्षमता परत मिळवण्याचा उपाय)
इन्फॉर्मेशन ओव्हर लोड
ई-मेल, सोशल अपडेट आणि वेगवेगळ्या सूचना यामध्ये आपला दिवस संपतो. एकावेळी सगळ्या गोष्टी म्हणजेच मल्टिटास्किंग करणं बऱ्याच जणांना कठीण जातं आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूवर ताण येतो. इन्फॉर्मेशन ओवरलोडमुळे मेंदूवर देखील परिणाम होत राहतो.
बराच वेळ बसून राहणं
सतत बसून काम करण्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. संशोधनानुसार कोणतीही शारीरिक अॅक्टिविटी न करता सातत्याने कामासाठी बसून राहण्यामुळे मेंदूवर देखील परिणाम होतो. बसून काम करण्यामुळे मेंदुवर तणाव येतो.
(आवडता पिझ्झा खाण्यापूर्वी हे वाचा; 1 त्रिकोण करतो तुमच्या आयुष्याची 8 मिनिटं कमी)
अपुरी झोप
हल्ली मोबाईलचा वापर इतका वाढला आहे की तासंतास लोक मोबाईल पाहत राहतात आणि त्यामुळे आपली झोप कमी होते. सतत अपुरी झोप घेतल्यामुळे शरीरावरती दीर्घकालीन परिणाम होतो. यामुळे ग्लूकोज लेव्हल कमी होते, स्ट्रेस वाढतो, डोकेदुखी, हार्मोनल इम्बॅलन्स, स्मृतीभ्रंशासारखे त्रास व्हायला लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brain, Health Tips, Lifestyle