नवी दिल्ली,31 मे : सगळ्यांनाच थकवा घालवण्यासाठी प्यावसं वाटणारं पेय म्हणजे कॉफी (Coffee) किंवा चहा (Tea) हे आहे. कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफिनमुळं (Caffeine) तरतरी (Freshness) येते. कही जण तर, कॉफीशिवाय राहूच शकत नाहीत. अनेकांच्या दिवसाची सुरवात कॉफीनेच होते. कॉफीमध्ये अॅन्टिऑक्सिडंट (Antioxidant) असल्यामुळं आरोग्यासाठीही (Health) चांगली आहे.
कॉफीचा वापर विविध पदार्थांमध्ये फ्लेवर (Coffee flavor) म्हणूनही करतात. पण कॉफी आणखी वेगळ्या प्रकारे वापरण्याची पद्धत (Different Type Of Use) अनेकांना माहिती नसते. घरात कॉफीच्या बिया (Coffee beans) असतील तर, त्यांचा चांगला वापर करता येतो.
दुर्गंध दूर करते
कॉफीच्या बियांमध्ये एक वेगळा सुगंध असतो. घरात ओलसरपणा, कचऱ्याचा वास किंवा कांदा-लसणाचा वास पसरला असेल तर, तो दूर करण्यासाठी कॉफी उत्तम काम करते. त्यासाठी कॉफीच्या बिया दुर्गंध येणाऱ्या ठिकाणी ठेवा किंवा कॉफी पावडरही ठेवू शकता. मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंदासाठी कॉफीच्या बिया गरम करून वापरा.
('...तो इशारा मांजरेकरांसाठीच,' रवींद्र जडेजाचा खुलासा)
भांडी घासण्यासठी
कॉफीच्या बिया खराब झाल्या असतील आणि फेकायची इच्छा नसेल तर, त्यांचा वापर भांडी घासण्यासाठी करता येतो. त्यासाठी कॉफीच्या बिया बारीक करा. पावडर भांड्यांवर टाका आणि नेहमी प्रमाणे घासा. कॉफी पावडर स्क्रबरचं काम करेल.
मच्छर जातील पळून
घरात कीडे, मुंग्या किंवा डास वाढले असतील तर, कॉफी वापरता येते. कोणत्याही रासायनिक कीटकनाशकापेक्षा हे चांगलं आहे. कॉफीचा सुगंध मूड रिलॅक्स होण्यास मदत करतो. कॉफीला एक स्ट्रॉंन्ग सुगंध आहे त्यामुळं घरातले कीडे, जंतू पळवण्यासाठी त्याचा वापर करता येतो. अगदी सोप्या पद्धतीनं हे वापरता येतं. त्यासाठी एका भांड्यात कॉफी वापडर भरुन ठेवा आणि दर आठवड्याला बदलत राहा.
('ते दीड वर्ष नीट झोपू शकलो नाही', रविंद्र जडेजानं सांगितला भीतीदायक अनुभव)
कुंड्यांमधील रोपांसाठी
कॉफी पावडर गुलाबाच्या झाडांसाठी खूप चांगलं खत म्हणून काम करू शकते. त्यात नायट्रोजन असल्यानं झाडांना फायदा होतो. पण, बाजारातली कॉफी पावडर वापरण्यापेक्षा घरात कॉफीच्या बिया बारीक करुन वापराव्यात. रोपाभोवतालची माती थोडीशी काढून त्यात 1 ते 2 चमचे कॉफी पावडर टाकावी. सर्वच झाडांसाठी कॉफी पावडर खत म्हणून वापरता येते.
(धुम्रपान करणाऱ्यांसाठी जास्त घातक आहे कोरोना, मृत्यूचा 50 टक्के अधिक धोका - WHO)
सजावटीसाठी वापर
घरात कॉफी बिया असतील तर, त्याचा वापर सजावाटीसाठी करता येतो. कॉफीच्या बिया दिसायला खूप छान असतात. शोपीस, कॅन्डल होल्डर, फ्लॉवर पॉट यावर त्या लावता येतात. घरात असलेल्या कॉफीच्या बिया खराब झाल्या असतील तर, त्या फ्लॉवर पॉटमध्ये भरून ठेवू शकता. त्यामुळं सगळीकडे सुवास दरवळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coffee, Home-decor, Tree plantation