मुंबई, 30 मे : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जेव्हा मैदानात मोठी खेळी करतो किंवा टीमला विजय मिळवून देतो, तेव्हा बॅटने तलवारबाजी करून सेलिब्रेशन करतो. 2019 वर्ल्ड कपदरम्यान (ICC World Cup 2019) रविंद्र जडेजा आणि भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्यात वाद झाला होता. वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या संजय मांजरेकर यांनी जडेजा बिट्स ऍण्ड पिसेस म्हणजेच थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करणारा खेळाडू असल्याचं वक्तव्य केलं होतं. जडेजाला मांजरेकर यांचं हे वक्तव्य अजिबात आवडलं नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 77 रनची खेळी करून जडेजाने बॅटने तलवारबाजी केली. हे सेलिब्रेशन म्हणजे मांजरेकर यांनाच इशारा होता, असं जडेजा म्हणाला आहे.
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 2019 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सेमी फायनलमध्ये जडेजाने शानदार खेळी केली. जडेजाच्या या खेळीमुळे भारत विजयाच्या जवळ पोहोचला होता. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जडेजाने 59 बॉलमध्ये 77 रन केले, पण तरीही न्यूझीलंडचा या सामन्यात विजय झाला. या सामन्यात केलेल्या अर्धशतकानंतर मी कॉमेंट्री बॉक्समध्ये संजय मांजरेकरांना शोधत होतो, कारण तलवारबाजीच्या सेलिब्रेशनने मला त्यांच्यावर निशाणा साधायचा होता, असा खुलासा जडेजाने केला आहे.
इंडियन एक्सप्रेसला जडेजाने मुलाखत दिली. 'तेव्हा तो खूप मोठा मुद्दा बनला होता. मी कॉमेंट्री बॉक्स शोधत होतो. मग मी विचार केला, ते कुठेतरी असतीलच, मी ते सेलिब्रेशन कोणावर निशाणा साधण्यासाठी करत होतो, ते सगळ्यांना माहितीच आहे,' असं जडेजा म्हणाला.
'2018 साली ओवलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टेस्टनंतर माझा खेळ पूर्णपणे बदलला. एखादा बॅट्समन जेव्हा इंग्लंडमध्ये रन करतो, तेव्हा चांगलं वाटतं. सर्वोत्तम बॉलिंग आक्रमणासमोर इंग्लंडच्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही रन करता तेव्हा, तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही जगात कुठेही रन करू शकता, हे तुम्हाला जाणवतं. नंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली, त्यामुळे माझं टीममध्ये पुनरागमन झालं. तेव्हापासून मी चांगला खेळत आहे,' अशी प्रतिक्रिया जडेजाने दिली.
रविंद्र जडेजा तीनही फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळतो. आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये इंग्लंडकडून खेळेल. यानंतर भारत-इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ravindra jadeja, Team india, World cup 2019